Headlines

Chhatrapati Sambhajinagar Court Exam Protest Suspended; Abhijeet Dipke


छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर अभि

.

न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असली तरी, परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आंदोलन सुरूच ठेवले होते. डीसीपी रत्नाकर नवले यांनी विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या वेबसाइटवर टाकलेले पत्र वाचून दाखवले, ज्यात तांत्रिक अडचणींचा उल्लेख होता. मात्र, विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम होते.

जर आठवडाभरात योग्य निर्णय न झाल्यास राज्यभरातील विद्यार्थ्यांना बोलावून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आमखास मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली आहे.

आंदोलनाचे फोटो…

छत्रपती संभाजीनगर येथील सुराणा नगर केंद्रावर झालेल्या गोंधळानंतर अभिजीत दिपके यांनी सायंकाळी पावणेपाच वाजता घटनास्थळी भेट दिली आणि या आंदोलनाला मोठे स्वरूप दिले. यावेळी काँग्रेस, एसएफआय, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि मनसे यांसारख्या विविध विद्यार्थी संघटनांनीही आंदोलनात सहभाग घेतला.

उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण येथील परीक्षांमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याचे नमूद केले आहे. मात्र, न्यायालयाच्या वेबसाइटवरील पत्रानंतरही विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम होते आणि त्यांनी पोलिसांकडे हीच मागणी लावून धरली होती.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये खिचडी, वडापाव आणि केळीचा समावेश होता. अक्षय पाटील या विद्यार्थ्याने खिचडीची सोय केली होती.

ही बातमी पण वाचा…

“जोपर्यंत Re-Exam होत नाही, आम्ही इथून जाणार नाही”:हायकोर्ट परीक्षेतील गोंधळावरून अभिजीत दिपकेंचा संताप, आंदोलनात सहभागी

छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका बसल्याने परीक्षा केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके देखील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, अशी भूमिका दिपके यांनी घेतली आहे. वाचा सविस्तर बातमी…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.