Headlines

लोणी बनवण्यासह पंक्चरशिकले, पटनोंदणीत वाढ:दीड महिन्यात 18 वरून 80




राज्यात जिल्हा परिषद व मराठी शाळांतील घटत्या विद्यार्थी संख्येवर चिंता व्यक्त होते, परंतु जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांच्या शैक्षणिक प्रयोगांमुळे या शाळेची विद्यार्थी संख्या दीड महिन्यात १८ वरून थेट ८० वर गेली आहे. वाडेकर यांच्या ‘बियाँड द वॉल्स’ (भिंतींच्या पलीकडे) या संकल्पनेनुसार त्या वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यांतच शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. उर्वरित वेळेत त्या विद्यार्थ्यांना ‘व्यावहारिक जगाशी’ अवगत करतात. यासाठी त्या विद्यार्थ्यांना पंक्चरचे दुकान, किराणा दुकान, शॉपिंग मॉल व स्विमिंग पूलमध्ये घेऊन जातात. तिथले काम कसे चालते, मुले याचा स्वतः अनुभव घेतात. अगदी घरात लोणी कसे बनवले जाते येथून ते दैनंदिन जीवनातील व्यावहारिक गोष्टी प्रत्यक्षपणे शिकवल्या जातात. या व्यावहारिक शिक्षणामुळे मुलांची अभ्यासातील आवड वाढली. हे पाहून आजूबाजूच्या पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी शाळेत रांग लावली. आयआयटीचे विद्यार्थी मुलांना शिकवत आहेत. या गावातील वाडेकर यांच्या वेतनाचा ७० टक्के भाग मुलांवर खर्च होतो. त्यांनी ६ मुले दत्तक घेतली आहेत.त्यात इंजिनिअरिंगपर्यंतचे विद्यार्थी आहेत. पहिल्या पोस्टिंगमध्ये हा प्रयोग, नंतर अनेक बदल पहिली पोस्टिंग मिळाली तेव्हा मी हा प्रयोग केला. त्यावर विद्यार्थ्यांसह पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुढे जाताना यात अनेक बदल झाले. -उज्ज्वला वाडेकर, शिक्षिका मॅडमच्या पुढाकारामुळे मी जवाहर नवोदय शाळेत आई-वडील नाहीत. दुसऱ्या इयत्तेतच मी घरातील सर्व कामे करत होते. पण मॅडमने अभ्यासाशी जोडले. आता मी जवाहर नवोदय विद्यालयात शिकत आहे. मला अधिकारी व्हायचे आहे. -आयुषी सोनवणे, विद्यार्थिनी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *