Headlines

नाशिक:खेळताना पाण्याच्या टाकीतपडून नाशकात बहिणींचा मृत्यू




घराच्या आवारात खेळत असलेल्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा जमिनीखालील पाण्याच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना माने नगर परिसरात घडली. तृप्ती विशाल सोनवणे(८) अाणि श्रास्वी विशाल सोनवणे (४) अशी या दाेघी सख्ख्या बहिणींची नावे आहेत. अयोध्या नगरी, माने नगर येथे डाॅ. विशाल सोनवणे हे पत्नी अाणि दोन मुलींसह राहतात. जवळच त्यांचे क्लिनिक अाहे. १५ अाॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास या दाेन्ही मुलींची अाई क्लिनिकमध्ये गेली होती. त्यापूर्वी तिने या दाेघींना जेवण दिले अाणि कंपाऊंडचे गेट बंद करुन त्या पतीला मदतीकरीता गेल्या. जेवणानंतर खेळताना दोघी मुली घराच्या अावारात जमिनीखालील पाण्याच्या टाकीत पडल्या. शेजारी राहणारे अमोल पोतदार यांच्या लक्षात ही घटना अाली. त्यांनी तातडीने दोघींना बाहेर पाण्याबाहेर काढले. जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *