![]()
खुलताबाद तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आयोजित तक्रार निवारण बैठकीत प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे निघाले. आपल्या विभागातील योजना, लाभार्थी आणि प्रलंबित कामांची प्राथमिक माहितीही काही अधिकारी-कर्मचाऱ्यांन ा देता आली नाही. त्यामुळे “आपल्या खात्याच्या कामाचा अभ्यास तरी करा,” अशा शब्दांत आमदार प्रशांत बंब यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. खुलताबाद तहसील कार्यालयात सोमवारी आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने विशेष तक्रार निवारण बैठक घेण्यात आली. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत असताना आमदारांनी विविध शासकीय योजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली. मात्र, प्रश्नांची सरबत्ती होताच अनेक अधिकारी-कर्मचारी निरुत्तर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्जमाफी योजनेअंतर्गत तालुक्यात किती शेतकरी पात्र ठरले, किती अपात्र झाले, याची आकडेवारी आमदार बंब यांनी विचारली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे आमदार बंब संतप्त झाले. या प्रकारावर आमदार प्रशांत बंब यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “आपल्या खात्याच्या कामाची माहितीच नसेल तर नागरिकांच्या समस्या कशा सोडवणार?” असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या कामाचा अभ्यास करून अद्ययावत माहिती ठेवण्याचे निर्देश दिले. प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश : कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि आपल्या विभागाच्या कामकाजाबाबत उदासीन असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांव र वरिष्ठ स्तरावरून कठोर प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश आमदार बंब यांनी तहसीलदार संतोष गुट्टे यांना दिले.
Source link
आ. बंब यांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी:कर्जमाफीपासून घरकुलांपर्यंतच्या आकडेवारीवर अधिकारी झाले निरुत्तर