Headlines

चंद्रभागेत 22 हजार क्यूसेक विसर्ग, पात्रातील मंदिरांना वेढा:चंद्रभागा घाटावर भाविकांचा जीव धोक्यात, सुरक्षा रक्षक मोबाइलमध्ये मग्न



उजनी आणि वीर धरणातून सातत्याने कमी अधिक स्वरूपात पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी येथील चंद्रभागेत २२ हजार क्युसेकचा विसर्ग असताना सर्व यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाविक जीव धोक्यात घालून चंद्रभागा स्नान करताना दिसून

.

दोन दिवसांपासून पंढरपुरात भीमा (चंद्रभागा) नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीचा विसर्ग २२ हजार १७८ क्युसेक्स इतका झाला आहे. या वाढत्या पाणीपातळीमुळे वाळवंटातील सर्व लहान-मोठी मंदिरे, समाध्या पाण्याने वेढल्या आहेत. चंद्रभागा घाटावर पाणी आलेले असून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्तावलेली दिसतेय.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने याठिकाणी बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. मात्र ते घाटावर बसून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येतात. एकीकडे घाटावर धोका वाढलेला असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. भाविक धोकादायक ठिकाणी स्नान करत असताना, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नियुक्त केलेल्या बीव्हीजी कंपनीचे ठेकेदारी कर्मचारी घाटावर उपस्थित असूनही सुरक्षेबाबत बेफिकीर दिसताहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *