Headlines

फुलांचे क्षेत्र 312 हेक्टरने घटले; 836 हेक्टरवर फुलवली शेती:हवामानामुळे उत्पादनातही 2800 टनांची घट होण्याची चिन्हे; ऐन सणासुदीत अडचण शक्य‎



फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल असला तरी यंदा जिल्ह्यातील फूलक्षेत्रात मोठी घट होण्याची चिन्ह आहेत. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा फुलांचे क्षेत्र तब्बल ३१२ हेक्टरने कमी झाल्याचा आकडा सद्यस्थितीत समोर आहे. परंतु ऑक्टोबरअखेर अंतिम नोंदीपर्यंत हा आकड

.

कृषी विभागाच्या फूलक्षेत्राच्या माहितीनुसार, २०२४-२५ आणि २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात फुलांचे एकूण क्षेत्र १,१४८.२० हेक्टर होते. यंदा हे क्षेत्र ८३६.२० हेक्टरवर आले आहे. त्यामुळे वर्षभरात फूलक्षेत्रात ३१२ हेक्टर, म्हणजेच सुमारे २७ टक्के घट झाल्याचे प्राथमिक दिसून येत आहे. ऑक्टोबरअखेर अर्थात पुढील दोन महिन्यांत लागवड वाढून हे क्षेत्र वाढल्यास, उत्पादनात घट ऐवजी वाढ दिसू शकते. दोन वर्षांत जिल्ह्यात फुलांचे एकूण उत्पादन ९२०३.२० टन होते. यंदा हे उत्पादन ६४२३.३३ टनांवर येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संधी ^ दीड ते दोन महिन्यांचे पीक असल्याने फुलांचे लागवड क्षेत्रात वाढ अथवा घट दिसून येते. यंदाची एकूण आकडेवारी ऑक्टोबरअखेर स्पष्ट होईल. पण सध्या जरी घट दिसत असली तरी प्रत्यक्षात फूल क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी कुंभमेळा आहे, तसेच विविध सण उत्सव काळात फुलांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे वळाल्यास उत्पादन वाढू शकते. – सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक, कृषी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *