Headlines

संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांमधील सिंचनासाठी 6,477 कोटी मंजूर:पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी 4150 कोटींच्या आराखड्यास मान्यता, मंत्रिमंडळ निर्णय




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाडा तसेच अहिल्यानगरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ साठी ६ हजार ४७७ कोटी रुपयांची सुधारित तरतूद मंजूर करण्यात आली. यात माजलगाव धरण, कालव्याची कामे होतील. ही कामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत झाली तर पुढील तीन ते चार वर्षांत पाच जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्याचा लाभ सुमारे ७० हजार शेतकऱ्यांना होऊ शकतो. याशिवाय बहुप्रतीक्षित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा ४,१५० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. हा आराखडा अडीच वर्षांत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण ९ महत्त्वपूर्ण निर्णयांना हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यात प्रामुख्याने क्रीडा, जलसंपदा, महसूलच्या सुधारणांना प्रशासकीय मंजुरीचा समावेश आहे. तांदूळ : वाहतुकीसाठी ३२८.४७ कोटींचा निधी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०२४-२५ मधील धान व भरडाई तांदळाच्या वाहतूक खर्चासाठी ३२८ कोटी ४७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.एकूण खर्चापैकी केंद्र शासनाकडून अंदाजे ८० कोटी रुपयांचा परतावा मिळणार असून राज्य शासन २४८ कोटी ४७ लाखांचा अतिरिक्त भार उचलेल. सोलापूर : जांबमुनी मोची समाजाला शैक्षणिक भूखंड सोलापूर उत्तर सदर बझार येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित ३ हजार ९१० चौरस मीटर जमीन श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील २,३४६ चौ.मी. क्षेत्र प्रचलित बाजारमूल्याच्या २० टक्के रक्कम आकारून कब्जेहक्काने दिले जाईल. मोशी येथे क्रांतिवीर चापेकर समितीच्या आदिवासी केंद्रासाठी १५ हेक्टर जागा मोशी (ता. हवेली, जि. पुणे) येथील १५ हेक्टर शासकीय जमीन क्रांतिवीर चापेकर समिती संचालित समरसता गुरुकुलम आदिवासी आश्रमशाळेला महसूलमुक्त आणि विनामूल्य भोगवटादार वर्ग-२ म्हणून वंचित घटकांच्या सर्वांगीण सामाजिक-शैक्षणिक विकास केंद्रासाठी दिली जाईल. पिंपरी-चिंचवड मनपाला जमिनीचा ताबा मिळाल्यापासून ३ वर्षांत केंद्राचे काम सुरू करण्याची अट घालण्यात आली आहे. गडचिरोली : जिल्हा क्रीडा संकुलासाठी ८० कोटी गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. या निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, जलतरण तलाव, टेनिस-कबड्डी मैदाने आणि प्रेक्षक गॅलरी उभारली जाणार आहे. माजलगाव धरण, कालवे दुरुस्तीचा लाभ ७० हजार शेतकऱ्यांना होण्याची शक्यता गोदावरी खोऱ्यातील माजलगाव धरण व कालव्यांच्या कामांसाठी ६,४७७ कोटी ८८ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देण्यात आली. बीड, नांदेड, परभणी, अहिल्यानगरातील सव्वा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या ५ जिल्ह्यांतील १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टर क्षेत्र थेट सिंचनाखाली येईल. दुष्काळ हटवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न प्रकल्पांतर्गत पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण आणि माजलगाव उजव्या कालव्यासह उपसा सिंचन योजनांची कामे तातडीने पूर्ण केली जातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *