Headlines

Amit Thackeray Slams Government Over College Girls Pocket Money Scheme


राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा 2 हजार रुपये ‘पॉकेट मनी’ देण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. मात्र, सरकारच्या य

.

काय आहे राज्य सरकारचा नवा प्रस्ताव?

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. २०) मंत्रालयात काही महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या नव्या योजनेचे सूतोवाच केले. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक मदत मिळावी आणि शिक्षण घेताना त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या धर्तीवर दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी देण्याचा सरकारचा विचार आहे.

सीएसआर (CSR) निधीचा वापर

या योजनेसाठी शासनाच्या तिजोरीवर भार न टाकता, विद्यापीठे आणि मोठ्या महाविद्यालयांसोबत चर्चा करून कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून हा खर्च भागवण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जाणार आहे. हा निर्णय प्रत्यक्षात लागू झाल्यास, राज्यातील जवळपास १२ लाख उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना याचा थेट फायदा होऊ शकेल. यामुळे राज्यात मुलींच्या उच्च शिक्षणाचा टक्का वाढेल, असा सरकारला विश्वास आहे.

अमित ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

सरकारच्या या प्रस्तावावर अमित ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, पॉकेट मनी देणे हे आई-वडिलांचे काम असते. जर सरकारने दिलेल्या या फुकटच्या पैशांतून तरुण मुला-मुलींना व्यसने (दारू, सिगारेट) लागली किंवा ते चुकीच्या मार्गाला गेले, तर त्याची जबाबदारी सरकार आणि चंद्रकांत पाटील घेणार आहेत का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आधी महाविद्यालयांची दुरवस्था दूर करा”

केवळ मते आकर्षित करण्यासाठी फुकट पैसे वाटण्यापेक्षा महाविद्यालयांमधील वसतिगृहे, कँटीन आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रलंबित प्रश्न आधी सोडवा, अशी मागणी त्यांनी केली. उच्च शिक्षण मंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, आपणच नेत्यांना ‘सेलिब्रिटी’ करून ठेवले आहे. ते कोणत्याही आमदाराला, खासदाराला किंवा जनतेला उत्तरे द्यायला बांधील मानत नाहीत. कोणी प्रश्न विचारला तर त्याला थेट देशद्रोही किंवा ‘अर्बन नक्षल’ ठरवले जाते. मंत्री स्वतः कधीही महाविद्यालयांचे पाहणी दौरे करत नाहीत.

फुकट पैशांमुळे कष्ट करण्याची इच्छाच मरेल

या वयात फुकट पैसे मिळाले, तर या मुलांमध्ये भविष्यात स्वतः कमवण्याची आणि कष्ट करण्याची इच्छाच उरणार नाही. ‘लाडकी बहीण’ गेली, आता ‘लाडकी मुलगी’ आली… सरकार जबाबदारी न घेता केवळ फुकट पैसे वाटत सुटले आहे, असा हल्लाबोल अमित ठाकरे यांनी केला.

योजना अजून अंतिम टप्प्यात नाही

महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थिनींना दरमहा २ हजार रुपये देण्याचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभाग या प्रस्तावावर विचार करत असून विद्यापीठे, महाविद्यालये आणि सीएसआरच्या माध्यमातून त्याची व्यवहार्यता तपासली जात आहे. त्यामुळे सध्या ‘राज्यातील 12 लाख मुलींना दरमहा 2हजार रुपये मिळणार’ असा अंतिम निर्णय झालेला नसून, असा प्रस्ताव आणि त्यासाठीचा विचार सुरू आहे, हे स्पष्ट आहे. योजना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी तिचे निकष, निधीचा स्रोत, पात्र विद्यार्थिनींची संख्या आणि अंमलबजावणीची पद्धत निश्चित करावी लागणार आहे. दरम्यान, विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न आणि थेट पैसे देण्याऐवजी सुविधा व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची मागणी, या दोन भूमिकांमुळे या प्रस्तावावर आगामी काळात राजकीय आणि विद्यार्थी संघटनांमध्ये चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…

मुलींचा हात धराल तर मार खाल!:विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमधील राड्यानंतर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा

विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या घटनेवरून अभाविपला थेट इशारा दिला आहे. “तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच. आमच्या नादाला लागू नका,” असा आक्रमक इशारा अमित ठाकरे यांनी दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.