Headlines

पुढच्या जन्मी नक्की डॉक्टर बनेल…:वैजापूर तालुक्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या




वैजापूर तालुक्यातील खंडाळा (भवरबेंद) येथे एक अत्यंत सुन्न करणारी घटना घडली आहे. ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सूरज सुभाष शिंदे (वय 19) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली अत्यंत भावनिक चिठ्ठी निष्पन्न झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हा नेहमीप्रमाणे त्याच्या घरातील वरच्या खोलीमध्ये नीट परीक्षेचा अभ्यास करत होता. गावामध्ये सप्ताह सुरू असल्याने घरातील सर्व मंडळी सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी गेले होते, त्यामुळे घरी कोणीही नव्हते. अभ्यासाच्या तणावातून किंवा अन्य कारणास्तव सूरजने घरातील वरच्या खोलीत गळफास लावून आपले जीवन संपवले. सप्ताहाचा कार्यक्रम आटोपून कुटुंबीय दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घरी परतले. त्यांनी सूरजला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे सुभाष शिंदे यांच्या लहान मुलीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता, सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हे दृश्य पाहून तिने मोठा आक्रोश केला. तिच्या आवाजाने खाली असलेले वडील सुभाष शिंदे आणि इतर नातेवाईकांनी तातडीने वरच्या खोलीत धाव घेतली. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कुटुंबियांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण खंडाळा परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर भवरबेंद वस्तीवरील स्वतःच्या शेतात शोकाकुल वातावरणात सूरजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

करमाडला आढळला‎ महिलेचा मृतदेह‎ दुसरीकडे करमाड-लाडसावंगी रस्त्यावरील ‎करमाड एमआयडीसी परिसरातील ‎करमाड शिवारात दर्ग्याजवळील‎ विहिरीत 40 ते 45 वर्षे वयोगटातील‎ अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून ‎आला. मृत महिलेची अद्याप ओळख ‎पटलेली नसून करमाड पोलिसांकडून तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात ‎येत आहे.‎ करमाड शिवारातील‎ दर्ग्याजवळील विहिरीत महिलेचा‎ मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून ‎आला. अग्निशमन दलाच्या ‎जवानांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह ‎विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर ‎मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी‎ रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय ‎अधिकाऱ्यांनी रात्री 10.50 वाजता ‎महिलेला मृत घोषित केले. हे ही वृत्त वाचा

महाराष्ट्रात नराधमांना राजकीय पाठबळ:मोदी पुढचे 7 ते 8 महिनेच पंतप्रधान राहतील, शहा सुद्धा त्यांच्यासोबतच जातील- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील 7 ते 8 महिनेच पंतप्रधान असतील, या मुद्द्यावर माझे आणि राहुल गांधी यांचे एकमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी हेच सांगत आहे. ते त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत; त्यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये हे पद सोडावे लागणार आहे. 17 सप्टेंबर रोजी हे सर्व काही तुम्हाला कळेल; तो पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस असेल. अमित शहा कधीही पंतप्रधान होणार नाहीत, कारण मोदी गेले की तेही जातील, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *