![]()
टीडीआर प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वाद सुरू असतानाच आता ठाण्यातील प्रस्तावित “डेटा सेंटर’ आणि टीडीआर प्रकरणावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. गडकरी रंगायतन येथील जनता दरबारात बोलताना गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका व प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. टीडीआर प्रक्रियेवर स्टे आणण्यासंदर्भात बोलताना, “स्टे देण्यास नक्कीच उशीर झाला, पण बैल गेला आणि झोपा केला, असा प्रकार आहे,’ अशी चपराक त्यांनी लगावली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित जमिनीच्या बदल्यात एका खासगी कंपनीला दिला जाणारा टीडीआर हा २,७०० कोटींचा नसून तब्बल ४,००० कोटी रुपयांचा असल्याचा दावाही त्यांनी केला. मंत्री सरनाईकांचे प्रत्युत्तर या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, संबंधित टीडीआर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच देण्यात आला आहे. वन विभागाने वेळेत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे न्यायालयाने एकतर्फी निकाल दिला, असे सांगत सरनाईक यांनी चेंडू वन विभागाच्या कोर्टात ढकलला. महापालिका आयुक्तांनी वन विभागाशी वारंवार संपर्क साधून न्यायालयात बाजू मांडण्याची विनंती केली होती, असा दावाही त्यांनी केला.
Source link
आराेप-प्रत्याराेप:शिंदे-नाईक संघर्षात आता ‘डेटा सेंटर’ आणि ‘टीडीआर’वरून वादाचा भडका, टीडीआर तब्बल 4,000 कोटी रुपयांचा असल्याचा दावा