Headlines

Maharashtra Shiv Sena Disqualification Case Hearing; Shinde Group Argument


शिवसेनेचे नाव, ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज पुन्हा एकदा पार पडणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही. मोहना यांच्या त्रिसद

.

कालच्या सुनावणीत काय घडले?

ठाकरे गटाच्या वकिलांनी काल विधानसभा अध्यक्षांचा निकाल आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार प्रहार केले.

  • पक्षांतर हे पाप आहे: ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ‘किहोटो होलोहन’ आणि ‘कर्नाटक’ खटल्यांचे संदर्भ देत बंडखोर आमदारांच्या कृतीला बेकायदेशीर ठरवले आणि त्यांना मान्यता दिल्यास पक्षांतराला खतपाणी घातले जाईल, असा युक्तिवाद केला.
  • शिंदे गटाचा दावा अनधिकृत बांधकामासारखा : सिब्बल यांनी शिंदे गटाच्या दाव्यांची खिल्ली उडवत, ते बेकायदेशीर कृतीच्या जोरावर वैधता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली.
  • चिन्ह गोठवण्याची मागणी : ठाकरे गटाने ‘शिवसेना’ नावावर आपलाच अधिकार सांगत, शिंदे गटाकडे असलेले ‘धनुष्यबाण’ चिन्ह तातडीने गोठवण्याची मोठी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा थेट प्रश्न

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी विचारले की, “जर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल, तर सर्वोच्च न्यायालय स्वतः अध्यक्षांची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकते का?” यावर उत्तर देताना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी, “न्यायालय स्वतःला असलेल्या ‘न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या’ अधिकारात थेट अपात्रतेचा निर्णय देऊ शकते,” असे स्पष्ट केले.

आजच्या सुनावणीत काय अपेक्षित आहे?

काल ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद झाला. आजच्या सत्रात ठाकरे गटाच्या वतीने अंतिम युक्तिवाद करण्यात येईल. यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील न्यायालयात आपली बाजू मांडतील.

ठाकरे गटाने केलेले गंभीर आरोप, विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेसंदर्भातील निर्णय योग्य कसा आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांना दिलेली मान्यता कशी कायदेशीर आहे, यावर शिंदे गटाकडून सविस्तर युक्तिवाद केला जाण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा…

चिन्ह आम्ही नाही, निवडणूक आयोगाने दिले:शंभूराज देसाईंची ठाकरे गटावर टीका, म्हणाले- धनुष्यबाण गोठवा म्हणणे म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणे

“धनुष्यबाण हे केवळ एक चिन्ह नसून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. बाळासाहेबांनी या चिन्हाला देवाऱ्यात पुजले होते. आता ‘धनुष्यबाण आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवून टाका’, ही मागणी करणे म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे आहे,” असा जोरदार घणाघात शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटावर केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने (उबाठा) केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देण्यासाठी शंभूराज देसाई यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.