Headlines

वाकडमध्ये स्कूल बसला आग:विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्परता




पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील काळाखडक परिसरात गुरुवारी सकाळी एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही कारण बसमध्ये त्यावेळी विद्यार्थी नव्हते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ही स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत होती आणि काळाखडक परिसराकडे जात असताना बसमधून अचानक धूर बाहेर पडू लागला. चालकाच्या निदर्शनास येताच त्याने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली . सुदैवाने बस मध्ये विद्यार्थी नव्हते त्यामुळे हानी टळली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी अग्निशमन केंद्रातील पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्याची कार्यवाही सुरू केली आणि काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये स्कूल बसचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, हे एक महत्त्वाचे सकारात्मक बाजू आहे. अग्निशमन विभागाच्या लीडिंग फायरमन निखिल गोगावले, फायरमन गणेश मुसळे, फायरमन संकेत पारेकर, फायरमन दीपक कोठे, ट्रेनी सब ऑफिसर ज्ञानेश्वर हाके, ट्रेनी फायरमन प्रसाद बागेकरी आणि वाहनचालक संजय बिस्किटे यांच्या पथकाने ही कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनांमधून धूर येणे, जळण्याचा वास येणे, वायरिंगमध्ये बिघाड होणे किंवा अन्य कोणतीही असामान्य बाब निदर्शनास आल्यास वाहन तात्काळ सुरक्षित ठिकाणी थांबवावे. तसेच, आगीची शक्यता भासल्यास त्वरित अग्निशमन विभागाच्या १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *