Headlines

Maharashtra Weather Update: Monsoon Break Concerns Farmers


महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. सर्वसामान्यांना

.

कोकणात पावसाचा जोर ओसरला

२१ ऑगस्ट रोजी संपूर्ण कोकण विभागात पावसाचा कोणताही अलर्ट नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. मात्र, पुढील ४-५ दिवस पावसाचा जोर कमी राहील. या काळात वातावरणात दमटपणा जाणवेल आणि काही काळ सूर्यदर्शन होण्याचीही शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत केवळ हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या उघडीपमुळे या भागात पावसाची तूट निर्माण होत असून, पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची नितांत आवश्यकता आहे.

दुसरीकडे, मराठवाड्यातही पावसाची मोठी दडी पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल; मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही.

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णता वाढली

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भातील हवामानात तर मोठे बदल जाणवत असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस थांबल्याने तिथे कोरडे, दमट आणि उष्ण वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भातही केवळ काही ठिकाणी स्थानिक पातळीवर हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा अलर्ट नाही. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मान्सूनची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. मात्र, शेतकऱ्यांनी पिकांची स्थिती आणि जमिनीतील ओलावा लक्षात घेऊनच शेतीचे पुढील नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्यास राज्यात पावसाचे पुनरागमन होऊ शकते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपग्रह नकाशात पाहा मान्सूनच्या ढगांची स्थिती

हेही वाचा..

MPच्या दिंडोरी, पन्नामधील सर्व शाळा बंद: UPच्या 13 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती, हिमाचलमध्ये आतापर्यंत 205 लोकांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांमध्ये सतत पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. टीकमगढ, छतरपूर, पन्ना, सागर आणि दमोहमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिंडोरी आणि पन्नामध्ये सर्व शाळा बंद आहेत.

उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 13 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. 84 हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. काशीमध्ये विश्वनाथ मंदिराचा गंगा दरवाजा बंद करण्यात आला आहे. मणिकर्णिका-हरिश्चंद्र घाटावरील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तर, प्रयागराजमध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे रस्ते आणि गल्ल्या तलावात बदलल्या आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.