![]()
शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वसामान्य नागरिक तीव्र भीतीच्या छायेत वावरत आहेत. मात्र, या अत्यंत गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासन डोळेझाक करत असून, केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा कर
.
शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर मोकाट कुत्र्यांचे जत्थेच्या जत्थे फिरताना दिसत आहेत. हे कुत्रे चालत्या वाहनांवर झडप घालत असल्यामुळे अनेकदा अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरून शाळेची लहान मुले व मुली पायी किंवा सायकलवरून ये-जा करतात. मोकाट कुत्रे अचानक अंगावर धावून आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडेच सोलापुरात रेबीजमुळे एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच पाहायला मिळत आहे. या समस्येची व्याप्ती एवढी वाढली आहे की, आता सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पोलिस ठाण्याच्या आवारात आणि रेल्वे स्टेशन परिसरातही मोकाट कुत्र्यांचे जत्थे मुक्तपणे वावरताना दिसत आहेत.त्यामुळे पोलिस ठाण्यात विविध कामानिमित्त येणारे नागरिक आणि खुद्द पोलिस कर्मचारीही सुरक्षित राहिलेले नाहीत. मोकाट कुत्र्यांचा ^सर्वोच्च न्यायालयाने मोकाट कुत्र्यांबाबत दिलेल्या निर्णयाचा नगरपालिका आदर करते. लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका लक्ष घालेल. – डॉ. मोहसीन मकणू, आरोग्य सभापती मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे शहरात सर्वत्र प्रमुख मार्गासह, गल्लीबोळातही लहान मुळांपासून वृद्धांपर्यंत कोणीच सुरक्षित नाही.तरी प्रशासनाने लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. गणेश जाधव, नागरिक
प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
तातडीने कारवाईची नागरिकांची मागणी प्रशासनाने कोणतीही परीक्षा न पाहात या अत्यंत गंभीर व जीवघेण्या समस्येची तत्काळ दखल घ्यावी आणि तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी संपूर्ण शहरातून केली जात आहे.