Headlines

नीलगाय, रानडुकरांनी फस्त केलेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या




अमरावती जिल्ह्याच्या बहुतेक भागातील शेतकऱ्यांना रोही, नीलगाय, रान डुकरे व अन्य वन्य प्राण्यांच्या हैदौसामुळे पीक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सदर वन्य प्राण्यांमुळे शेतीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी मानव-प्राणी संघर्षही होत आहे. त्यामुळे शेतीपिकांसह जीवितहानीही होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासोबतच संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. या मागणीला अनुसरुन आज, बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना साकडे घालण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. निवेदनातील मजकुरानुसार रोही, नीलगाय, रानडुकरे व अन्य वन्य प्राण्यांमुळे अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी बारा तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणात शेतीमधील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. एवढेच काय तर अमरावती ते चांदूरबाजार, अमरावती ते दर्यापूर, अमरावती ते परतवाडा, अमरावती ते भातकुली, अमरावती ते दर्यापूर, अमरावती ते कुऱ्हा आणि अमरावती ते मोर्शी मार्गावर रोही व वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रचंड प्रमाणात रस्ते अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे शेतकरीविरोधी असलेला वन कायदा शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत ढकलतो आहे. त्यांची पिके नष्ट होत असून जीविताची कोणतीच खात्री राहिली नसल्याचे सध्याचे चित्र आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार आपली गाऱ्हाणी प्रशासनापुढे मांडली. परंतु त्याची साधी दखलही घेतल्या जात नाही, हे विभागीय आयुक्तांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्याचवेळी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी प्रकाश साबळे यांच्यासह सुनील राणा, उमेश ढोणे, आशिष कावरे, देवानंद राठोड, गंगाधर श्रीखंडे, शेखर अवघड, मंगेश इंगोले, तुषार पडोळे, चेतन पाथरे, विश्वंभर मारके, अमित कुचे, रुपेश कळसकर, संजय डहाणे, बाबाराव लेव्हरकर, सचिन लेव्हरकर, संजय लोखंडे, विजु लोखंडे, मंगला लोखंडे, कैलाश सांगळे, प्रशांत खवले, राजेश जावरकर, विक्रम खवले, आदित्यनाथ सोनके, सतिश राव, सुनील ठाकरे, किशोर आमले, श्याम मंगले, दिलीप मेश्राम, धनराज मेहरे, नितीन आमले, प्रदीप ढोले, प्रल्हादराव पाळेकर, अशोक घाटोळ, रामकृष्ण खवले, गोपाल जयस्वाल, जगदीश जनारकर, मनिश हिवे, दिनेश टाकरखेडे, देवानंद सोळंके, दिनेश सिनकर, दिलीप ठाकरे उपस्थित होते. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्याशी चर्चा करताना प्रकाश साबळे, गुरुदेवभक्त व इतर नागरिक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *