![]()
येथील बजरंगनगर वस्तीतील रहिवाशांना आहे, त्याच ठिकाणी शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भारतीय महिला मुक्ती मोर्चाच्यावतीने पुढे आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला साकडे घालण्यात आले. ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामपंचायत अधिकार
.
अंजनगाव बारी येथील बजरंगनगर वस्ती ही सुमारे १५ वर्षांपूर्वी वसलेली आहे. तेव्हापासून येथील नागरिक याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. विशेष असे की या रहिवाशांना ग्रामपंचायतीमार्फतच जागेची मोजणी करून देण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांनी तेथे पक्की घरे बांधली असून या वस्तीसाठी घरटॅक्स आकारणी, ८-अ उतारे, नळजोडणी, वीजजोडणी यांसह विविध सुविधाही प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, आता अचानक घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधित रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याठिकाणी वास्तव्य असल्याने त्यांचे दैनंदिन संबंध योग्यरित्या जोडले गेले आहेत.
अन्यथा भारतीय महिला मुक्ती मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भारतीय महिला मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खरात आणि राष्ट्रीय सरचिटणीस संगीताताई वाघ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देतेवेळी बजरंगनगरातील नागरिक, महिला तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. दरम्यान परिसरातील नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा देत आहे त्याच ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळावा, अशी मागणी केली आहे.
पक्क्या घरांची नुकसान भरपाई टाळणे, हाही विरोधाचा एक मुद्दा पक्क्या घरांची नुकसानभरपाई न देता रहिवाशांना जागा सोडण्यास भाग पाडले जात आहे. असे करणे अन्यायकारक असल्याचे महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व रहिवाशांचे म्हणणे आहे. त्याचवेळी स्थलांतर न केल्यास घरकुल योजनेसाठी मंजूर झालेला संबंधितांचा दावा रद्द होईल आणि मिळालेला हप्ताही परत करावा लागेल, अशी भीती प्रशासनाद्वारे नागरिकांना दाखविली जात आहे.