Headlines

शिराळ्यामध्ये सर्वधर्मीय सेवेसाठी शीत शवपेटी भेट:गेट टुगेदर ऐवजी सामाजिक कार्यावर केला खर्च‎




गेट-टुगेदरच्या निमित्ताने केवळ मित्रमंडळींसाठी खर्च करण्याऐवजी आपल्या गावासाठी आणि सर्व समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचा संकल्प किशोर साखरवाडे व पराग भस्मे या दोन मित्रांनी साकारला. त्यांच्या या संकल्पनेला शिराळा येथील तेली समाजाच्या युवा वर्गाने उत्स्फूर्त साथ देत श्री संताजी तेली समाज, शिराळा यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे शीत शवपेटी भेट देण्यात आली आहे. साखरवाडे यांना आपल्या जन्मगावासाठी काहीतरी करण्याची कायमच इच्छा होती. त्यातूनच वर्गमित्रांचे गेट-टुगेदर आयोजित करून त्यावर खर्च करण्याऐवजी गावातील सर्व समाजाच्या उपयोगी पडेल असे काम करण्याची कल्पना पुढे आली. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना अंत्यविधीच्या प्रसंगी शीत शवपेटीसाठी बाहेरून व्यवस्था करण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा सर्व समाजातील नागरिकांसाठी उपलब्ध राहणार असल्याने आदर्श या उपक्रमातून निर्माण झाला आहे. या उपक्रमासाठी जयंत आमले, संजय भोकसे, विजय लांजेवार, प्रकाश आजमिरे, प्रकाश बावनकुळे, यांच्यासह संताजी तेली समाज, युवकांचे सहकार्य लाभले. भविष्यात शववाहिका व स्मशानभूमी सौंदर्यीकरण शीत शवपेटीपुरतेच हे सामाजिक कार्य मर्यादित न ठेवता भविष्यात गावासाठी शववाहिका उपलब्ध करून देण्याची कल्पनाही पुढे आली आहे. तसेच हिंदू स्मशानभूमी आणि बौद्ध स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करून त्या अधिक सुविधायुक्त करण्याचा मानस असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे या उपक्रमाला एका वस्तूच्या भेटीचे स्वरूप न राहता सामाजिक बांधिलकीच्या व्यापक चळवळीचे रूप मिळण्याची अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *