![]()
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उन्नती संस्था, मुंबई (शाखा रुईखेड) यांच्या वतीने तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील आदिवासी कोरकूबह
.
कोरकूबहुल भागातील शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांमधील भाषिक संवाद अधिक सुलभ व प्रभावी व्हावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. अनेकदा शिक्षकांना कोरकू भाषा अवगत नसल्याने वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अडचणी येतात. ही अडचण दूर करण्यासाठी शिक्षकांना कोरकू भाषेतील दैनंदिन संवादाचे प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षकांना प्रशिक्षण समजण्यास सोपे जावे म्हणून कोरकू व मराठी या दोन्ही भाषांचा समन्वय साधण्यात आला. साधन व्यक्ती म्हणून उन्नती संस्थेचे सुभाष केदार, दादाराव केदार आणि गायत्री लोणकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी दैनंदिन वापरातील शब्द, सर्वनाम, क्रियापदे, व्याकरण, वाक्यरचना, गाणी, गोष्टी आणि प्रत्यक्ष संवादाचा सराव करून घेतला. शिक्षकांनी स्वतःचा परिचय कोरकू भाषेत देण्याचे प्रात्यक्षिकही केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी उन्नती संस्थेचे अनिल शेलुकर, प्राजक्ता ठाकरे व प्रिया दारशिम्बे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांना अधिक सरावासाठी उन्नती संस्थेच्या ‘शिकू आनंदे’ पुस्तकाची आणि कोरकू-मराठी द्विभाषिक संवाद तक्त्याची माहिती देण्यात आली. संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या कोरकू गोष्टी, ऑडिओ स्टोरी आणि गाण्यांसारख्या द्विभाषिक डिजिटल साहित्याचा वर्गात वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
पुस्तक व ऑडिओ साहित्याचा वापर
कोरकू भाषेसाठी सराव गरजेचा ^कोरकू भाषा ही मराठी, हिंदी, गोंडी किंवा अहिराणी भाषांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती ऑस्ट्रो-एशियाटिक भाषा कुळातील असल्याने तिची शब्दरचना व भाषिक वैशिष्ट्ये वेगळी आहेत. त्यामुळे ही भाषा आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. – हेमांगी जोशी, संचालिका, उन्नती संस्था.