![]()
ऊर्जा संवर्धन, व्यवस्थापन आणि अक्षय ऊर्जेच्या प्रभावी वापरामध्ये सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (पंदेकृवि) राज्यस्तरावर यशाची ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे यांच्या वती
.
‘अक्षय ऊर्जा दिना’चे औचित्य साधून महाऊर्जाच्या अधिकृत पथकाने हा मानाचा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द केला. या पथकात महाऊर्जा अमरावतीचे विभागीय महाव्यवस्थापक अभिजित हिंगे, अकोला जिल्हा व्यवस्थापक शैलेश मुळे आणि प्रकल्प कार्यकारी अधिकारी विजय काळे यांचा समावेश होता. महाऊर्जा, पुणे येथे झालेल्या सादरीकरण स्पर्धेत अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) तथा नवीकरणीय ऊर्जा विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या ऊर्जा संवर्धन उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले होते. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात सौर ऊर्जेचा प्रभावी वापर, ऊर्जा बचत आणि विविध अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. याशिवाय कृषी व कृषी आधारित उद्योगांमधील ऊर्जा या विषयावरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (एआयसीआरपी-ईएएआय) आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत ऊर्जा संवर्धन, शाश्वत तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सर्व शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शेतमाल मूल्यवर्धन व प्रशिक्षण उपक्रम सोलर ड्रायर्स: नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभागामार्फत शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी सोलर टनेल ड्रायर आणि सोलर कॅबिनेट ड्रायर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. २. प्रशिक्षण व जागृती: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ, अभियंते आणि शेतकऱ्यांमध्ये अक्षय ऊर्जेबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे.