![]()
आजच्या एआयच्या काळात माहिती खूप मिळू शकेल परंतु खरे ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्हाला पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. स्पर्धेच्या माध्यमातून चांगले लेखक कलाकार व संवेदनशील अशी पिढी घडणार असून त्यासाठी आपल्याला पुस्तके वाचन सातत्याने करावे लागेल, अशी अपेक्षा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मुळे यांनी व्यक्त केली. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा, स्वातंत्र्यदिनानिमित्त चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, संचालक किरण आगरवाल, शिल्पा रसाळ, प्रा. ज्योती कुलकर्णी, ग्रंथपाल अमोल इथापे, स्पर्धेचे परीक्षक स्वाती रानडे, डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, चित्रकला स्पर्धेचे परीक्षक प्रशांत शेकटकर, प्रवीण साळुंखे उपस्थित होते. मुळे म्हणाले, आपल्या देशात अनेक महापुरुष हे वाचनातून, साहित्यातून घडले. आपली सुप्त मनशक्ती, कल्पनाशक्ती आणि खऱ्या अर्थाने “समृद्ध जीवनाची कला” ही वाचनातून निर्माण होते असे प्रतिपादन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मुळे यांनी केले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत निबंध स्पर्धा खुला गट प्रथम क्रमांक: सुमन धिरडे, द्वितीय क्रमांक: समृद्धी थोरात, तृतीय क्रमांक: तेजल शिंदे, उत्तेजनार्थ: वेदिका जाधव, अपूर्वा देसाई, ईश्वरी पावसे, जयश्री पोपळघट, शुभम पाटील निबंध स्पर्धा गट क्रमांक -१ शालेय गट प्रथम क्रमांक: आर्या शिंदे, द्वितीय क्रमांक : (विभागून) तन्मय पडोळे, द्वितीय क्रमांक विभागून: शुभंकर माळवदे, तृतीय क्रमांक विभागून:अस्मि सप्तर्षी, तृतीय क्रमांक विभागून : स्वरा टाकसाळे, उत्तेजनार्थ : हर्षदा जाधव, सिद्धी देव, अनुष्का चौधरी, काव्या कोठवळ, सेजाम दळवी, ओवी जायभाये, आर्या जाधव. चित्रकला स्पर्धा गट क्रमांक- १ इयत्ता पहिली ते दुसरी : भार्गवी अमृते, प्रथम क्रमांक, आन्वी मेहेत्रे – द्वितीय क्रमांक, कनिष्का बोरुडे – तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ: मनस्वी पडोळे, वेदिका काळे, सिफान शेख, ओवी फणसे, गिरीजा ढेरे, गट क्रमांक २- इयत्ता तिसरी ते चौथी प्रथम क्रमांक:रुद्राक्ष बिडकर, द्वितीय क्रमांक: अभिनंदिनी राऊत, तृतीय क्रमांक : समय कटके. उत्तेजनार्थ: गौरी मोरे, रुही पेटकर, मनश्री गोभे, सुयोग सुंबे, हर्षा कांडके चित्रकला स्पर्धा गट क्रमांक तीन – इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक: स्वरा बोल्ली, द्वितीय क्रमांक : जान्हवी तारळकर, तृतीय क्रमांक: सान्वी लोणकर, उत्तेजनार्थ:अन्वी गोफणे, आरव पवार, तेजस हराळ, आराध्या शेकडे, वैष्णवी बाळासाहेब यादव या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. स्पर्धेतील विजेत्यांना एक वर्षासाठी मोफत सभासदत्व प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र ठाकूर यांनी अहिल्यानगर जिल्हा वाचनालय वाचन संस्कृती वाढवणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना एक वर्षाचे मोफत सभासदत्व देणार असल्याचे जाहीर केले.
Source link
स्पर्धेच्या माध्यमातूनच घडेल भविष्यातील संवेदनशील पिढी:जिल्हा वाचनालयात निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा केला सन्मान