![]()
मान्सूनचा जोर ओसरला असला तरी राज्यात पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून, इतर भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या मान्सूनच्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून, अनेक ठिकाणी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आज मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर राज्यातील इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरमध्ये राज्यातील नीचांकी 17.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सर्वाधिक 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ढगाळ वातावरण छत्रपती संभाजीनगर शहरात आज हवामानात काहीसा बदल जाणवण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात सुमारे 27 अंश सेल्सिअस किमान तापमानाने होईल, तर दिवसभरात कमाल तापमान 28.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.दरम्यान, आज शहरात सरासरी 34.4अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची अपेक्षा आहे. आर्द्रता पातळी 87 टक्क्यांच्या आसपास असेल. वारे SSW दिशेने 7.7 किमी प्रतितास या मंद गतीने वाहतील. पैठण तालुक्यातील 78 हजार हेक्टर खरीप पिके धोक्यात गेल्या 22 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पैठण तालुक्यातील खरीप पिकांवर पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. कडक ऊन आणि वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, सोयाबीन, कपाशी, मका आणि तूर पिकांची पाने पिवळसर पडू लागली आहेत. त्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची तसेच उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. पैठण तालुक्यात यंदा सुमारे 78 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी तब्बल 49 हजार 942 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड असून, कपाशी हे तालुक्यातील प्रमुख पीक आहे. याशिवाय मका 2 हजार 408 हेक्टर, बाजरी 1 हजार 678 हेक्टर, तूर 1 हजार 325 हेक्टर आणि सोयाबीन 1 हजार 30 हेक्टर क्षेत्रावर आहे.यामुळे पैठण तालुक्यातील शेतकरी पाऊस लांबल्याने चिंतेत आहेत. पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि राजस्थानमध्ये मान्सूनचा जोर कायम आहे. मध्य प्रदेशातील 16 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा असून, अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशातील 13 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, एक लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे.उत्तराखंडमध्ये पावसामुळे 107 रस्ते बंद झाले असून, नैसर्गिक आपत्तींमध्ये 43 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राजस्थानातील 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, 23 ऑगस्टपासून मान्सून कमजोर होण्याचा अंदाज आहे. उपग्रह नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पहा..
हेही वाचा.. काशीचे सर्व घाट पाण्यात; छतांवर आरती, अंत्यसंस्कार:दिल्लीत चालू महिन्यात सामान्याहून अधिक पाऊस; राजस्थानात मान्सून कमजोर, पारा 40+ उत्तर प्रदेशात होणाऱ्या सलग पावसामुळे गंगा आणि घाघरा यांसारख्या सहा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. १३ जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लखनऊ आणि बाराबंकीसह पाच शहरांमध्ये शनिवार सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. वाराणसीमध्ये सर्व ८४ घाट पाण्याखाली गेले आहेत. मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्काराचे विधी छतावर केले जात आहेत, तसेच दशाश्वमेध घाटावरील गंगा आरतीही छतावरच आयोजित केली जात आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात मान्सूनचा जोर ओसरला:सोलापूरसह 4 जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, अनेक भागात ढगाळ वातावरण