![]()
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात एका खासगी हेलिकॉप्टरने आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक बिघाडामुळे ‘वीक सिग्नल’ मिळाल्याने वैमानिकाने निलज आणि बिसारी गावाजवळच्या तलावाकाठी हे हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवले. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्राप्त माहितीनुसार, ‘व्हीटी-पीबीएन’ क्रमांकाचे हे खासगी हेलिकॉप्टर हवेत असताना अचानक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. यंत्रणेला ‘वीक सिग्नल’ मिळू लागल्याने वैमानिकाने कोणताही धोका न पत्करता तातडीने लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना वैमानिकाने निलज आणि बिसारी गावाजवळील तलावाकाठची मोकळी जागा हेरून अत्यंत कौशल्याने हेलिकॉप्टर खाली उतरवले. यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. हे हेलिकॉप्टर कुठून उडाले होते आणि कुठे जात होते, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. गावाशेजारी अचानक हेलिकॉप्टर उतरल्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. हेलिकॉप्टर पुन्हा सुरक्षितपणे रवाना घटनेची माहिती मिळताच परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तांत्रिक तपासणी आणि आवश्यक ती पूर्तता झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हे हेलिकॉप्टर पुन्हा सुरक्षितपणे रवाना झाले. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रशासनाने आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. हेही वाचा.. मी मुख्यमंत्री झालो ही संविधानाची ताकद: नागपुरात ‘जेन झी’ सोबतच्या संवादात मुख्यमंत्री फडणवीसांनी उलगडला राजकीय प्रवास, क्रिकेटर तिलक वर्माची उपस्थिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील ‘मंथन-4’ च्या मंचावरून आपल्या राजकीय प्रवासाबाबत आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. तरुणांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मी या राज्याचा मुख्यमंत्री कसा झालो, ही केवळ लोकशाहीची कमाल आणि संविधानाची खरी ताकद आहे.” तसेच, भविष्यात कोणालाही जर राज्याचे मुख्यमंत्री व्हावेसे वाटले, तर त्यासाठीही याच संविधानाचे आणि भक्कम लोकशाही व्यवस्थेचे सामर्थ्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला क्रिकेटपटू तिलक वर्मा आणि बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील युवक उपस्थित आहेत. सविस्तर वाचा
Source link
भंडाऱ्यात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग:तांत्रिक बिघाडामुळे वीक सिग्नल, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना