Headlines

New threat of humid heat; Heatstroke possible within hours, even moderate temperatures can be fatal


  • Marathi News
  • National
  • New Threat Of Humid Heat; Heatstroke Possible Within Hours, Even Moderate Temperatures Can Be Fatal

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतात ‘दमट उष्णता’ हवामान बदलाचे सर्वात धोकादायक रूप बनत चालली आहे. हे वाढते तापमान व जास्त आर्द्रता यांचे असे समीकरण आहे, ज्यामध्ये शरीर घामाच्या माध्यमातून स्वतःला थंड करू शकत नाही. जर्नल क्लायमेट डायनॅमिक्समधील अभ्यासानुसार केरळमध्ये याचा जास्त धोका आहे.

भारतात आतापर्यंत उष्णतेच्या लाटेची ओळख मुख्यत्वे तापमानाच्या मर्यादेवरून केली जात असे. परंतु अभ्यासानुसार, केवळ तापमानावरून खरा धोका समजत नाही. जास्त आर्द्रतेमध्ये घाम लवकर सुकत नाही, शरीराची कुलिंग सिस्टम निकामी होते, शरीराचे मुख्य तापमान वाढते आणि काही प्रकरणांमध्ये काही तासांत उष्माघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत जास्त आर्द्रतेमध्ये मध्यम तापमान देखील जीवघेणे ठरू शकते.

युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या अक्षय देओरस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनात ८० वर्षांहून अधिक काळातील हवामान डेटाचे विश्लेषण केले. धोक्याची वेळ व ठिकाण ठरवण्यात दक्षिण-पश्चिम मान्सूनची मोठी भूमिका आहे. देओरस यांच्या मते मान्सूनच्या पद्धतीचा ४ आठवडे आधीपर्यंत अंदाज लावला जाऊ शकतो.

पावसात उत्तर भारतात असतो जास्त धोका

जेव्हा मान्सून आपल्या ‘सक्रिय टप्प्यात’ असतो, तेव्हा मध्य आणि उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडतो. या काळात हवेतील आर्द्रता (उकाडा) खूप जास्त वाढते. अध्ययन म्हणते की, या स्थितीत उत्तर भारतात दमट उष्णतेची लाट चालण्याची शक्यता सामान्यापेक्षा १२५% पर्यंत वाढते. अध्ययनानुसार, घातक दमट उष्णतेसाठी मान्सूनची अंतर्गत हालचाल जबाबदार आहे. याला बोरेल समर इंट्रासीझनल ऑसिलेशन म्हटले जाते.

‘ब्रेक’ मान्सूनमध्ये द्वीपकल्पीय भारतात धोका

जेव्हा मान्सून ‘ब्रेक फेज’ मध्ये जातो, तेव्हा पाऊस थांबतो आणि ढग विरळ होतात, ज्यामुळे सूर्याची थेट उष्णता वाढते. पाऊस तर थांबतो, पण हवेतील आर्द्रता नाहीशी होत नाही, ती तिथेच टिकून राहते. ही ती वेळ असते जेव्हा केरळ आणि दक्षिण भारतातील इतर राज्ये सर्वात अधिक असुरक्षित होतात.

केरळमध्ये दिवसासोबत रात्रीही गरम होताहेत….

केरळमध्ये दिवस उष्ण होण्यासोबतच रात्रीही गरम होत आहेत. यामुळे शरीराला सावरण्यासाठी कमी वेळ मिळतो. शहरांमध्ये उष्णता जास्त वेळ राहते व सागरी वारे आधीसारखे राहिले नाहीत. अशा परिस्थितीत जर तापमान उष्णतेच्या लाटेच्या मान्य मर्यादेपेक्षा खाली असेल, तरीही लोकांना गंभीर त्रास होत आहे.

तापमान नाही, ‘वेट-बल्ब’ जास्त योग्य निकष

अनेक शास्त्रज्ञ वेट-बल्ब तापमानाला विश्वसनीय मानतात. हे उष्णता आणि आर्द्रता दोन्ही जोडून धोका सांगते. वेट-बल्ब तापमान ३५° सेल्सिअस झाले, तर सावलीत बसलेला निरोगी माणूस देखील ६ तासांत धोक्यात येऊ शकतो. कारण अशा वेळी शरीर स्वतःला थंड करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरते.

धोका: कूलिंग सुविधा नसलेली कुटुंबे वृद्ध, ज्यांच्या घरांमध्ये व्हेंटिलेशन कमी आहे बाहेर काम करणारे मजूर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *