Headlines

300 किमीच्या तपश्चर्येनंतर झेंड्यांचे स्वगृही आगमन:श्रीसंत अवधूत महाराज देवस्थान, झेंडा जिर्णोध्दार पथयात्रा सोहळ्याचा भक्तिमय वातावरणात समारोप



तालुक्यातील रुक्मिणीचे माहेरघर तसेच विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपुर येथे श्री अवधूत महाराजांच्या झेंडे जीर्णोद्धाराच्या रथयात्रेचा समारोप नुकताच पार पडला. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्ये

.

महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर संत जन्माला आलीत, ज्यांनी आपल्या वाणी, लेखणी आणि विचारांतून संपूर्ण विश्वाला शांती, समता, बंधुता, प्रेम आणि भक्तीचा मार्ग शिकवला. याच संत परंपरेतील एक अग्रणी नाव म्हणजे संत अवधूत महाराज. त्यांनी रचलेल्या ओवी या भविष्याचा वेध घेणाऱ्या आहेत, आणि त्यामुळेच त्या आजच्या काळाला प्रासंगिक आहेत. अवधूत महाराजांचे अनुयायी हे महाराष्ट्रात सर्वदूर लाखोंच्या संख्येने पसरले आहेत. त्यामुळेच दिवसेंदिवस अवधुताच हे प्रस्थ वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भजन पूजनाने झालेला हा पथयात्रेचा प्रवास कौडण्यपुर ते राहू (मेळघाट) असा होता. राहू हे मेळघाटमधील अतीदुर्गम भागात पण निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले ठिकाण आहे. त्या जंगलातूनच अवधूत महाराजांचे झेंडे आणायचे होते. अती खडतर मार्ग, त्यातही उंच माथ्यावरून हे खूप वजनदार झेंडे घेऊन येणे खरोखरचं दिव्य होते, पण अवधूत भक्तांमध्ये जणू देवच संचारला होता. अशक्य वाटणार कार्य त्यांनी कसलीही तमा न बाळगता पूर्ण केले आणि भजन पूजनाच्या गजरात आणि ‘कृष्ण महाराज धनी अवधुत नाम’ असा घोषा करित ४ विशालकाय झेंडे आपल्या खांद्यावर उचलून डोंगरावरून खाली आणले.

पुढे या झेंड्यांची विधीवत पूजा करुन त्यांना मोठ्या ट्रकमध्ये टाकून परतीचा प्रवास सुरू केला. या प्रवासात प्रत्येक गावात करपूजा करणाऱ्यांचे भरभरून स्वागत झाले. हजारोंची गर्दी रस्त्यावर दुतर्फा या झेंड्यांचे दर्शन घेण्यासाठी जमत होती. अमरावतीमध्ये राजीवजी ठाकूर यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.

पुढे तिवसा येथील पंचवटी चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यानंतर शेंदुर्जणा बाजार, वाठोडा खुर्द शेंदूर्जणा माहोरा आणि नंतर कौडण्यपुर असा प्रवास करत ही जीर्णोध्दार पथ यात्रा चतूर्पती देवस्थान येथे दाखल झाली. झेंड्याची विधीवत पूजा करून या झेंड्यांना मंदिर परिसरात ठेवण्यात आले आहे आता जवळपास २ महिने या झेंड्यांवर प्रक्रिया करून १२ जूनला त्यांचा जीर्णोध्दार केला जाणार आहे.

या पथयात्रेचे संपूर्ण नियोजन संस्थानचे सचिव आणि तिवसा पं. स.चे माजी सभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक विलास माहूरे यांनी केले. मेळघाट येथील वन विभागाच्या परवानगीपासून ते पथ यात्रेत डॉ मनवरे यांच्या देखरेखी खाली संस्थेची अँब्युलन्स सज्ज करेपर्यंतची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. याशिवाय संस्थानचेअध्यक्ष रामदासजी निवल, उपाध्यक्ष राजणभाऊ खारकर, कोषाध्यक्ष वासुदेव चोपकर, महासचिव शिशुपाल इखार, संचालक मुकुंदराव चाफले, लाहानुजी वानखेडे, वसंतराव लोखंडे, प्रमोद इंगोले, नामदेव बेलगे, अवधूत शिरपुरे, प्रवीण खारकर, हरिभाऊ खारकर, अंकुश धुमंखेडे, किशोर माटे, देवराव माहूरे आदींनी या धार्मिक कार्याला हातभार लावला.

भूगोलासोबत इतिहास जपणारे देवस्थान महाराष्ट्र हे संत परंपरा लाभलेले एक वैभवशाली राज्य म्हणून ओळखले जाते. अनेक थोर संत मंडळी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली, ज्यांनी आपल्या राज्याला भक्ती परंपरेचा इतिहास दिला. असे म्हटले जाते की इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासोबतच इतिहासही आहे. कौंडण्यपूर येथील अवधूत देवस्थान अशा भूगोल, इतिहासाचे उत्तम उदाहरण आहे. कार्यक्रमात टवलारे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनच्या व व्हिडिओच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी कशा प्रकारे नोंदवाव्यात, त्यावर प्रभावीपणे कार्य कसे करावे आणि तक्रारींचे निराकरण कशा पद्धतीने करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बँक, हॉस्पिटल व विविध योजनांमध्ये ग्राहकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.त्यांनी यावेळी ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा केली यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हेल्पलाइनच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *