Headlines

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप:जिल्ह्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग‎




जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार, कर्मचारी सहभागी होणार असल्याने बहुतेक कार्यालये ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ नंतर हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करतील. आज दुपारी या संदर्भात सरकारी-निमसरकारी-शिक ्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांनी माध्यमांना ही माहिती दिली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून निवडक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून मागण्या मान्य होईस्तोवर हा लढा सुरु राहणार आहे. पत्रकार परिषदेला इतर पदाधिकारी भास्कर रिठे, अनिल मानकर, विजय सावरकर, डी. व्ही. देशमुख, एस. डब्ल्यू शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. जि.प. कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही या संपात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही. जिल्हा परिषदेत जि.प. लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना आणि जि.प. कर्मचारी संघटना अशा दोन स्वतंत्र संघटना आहेत. परंतु गेल्या काही आंदोलनांपासून मध्यवर्ती संघटना आणि जि.प. कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे इतर कार्यालयातील कामगार-कर्मचारी संपात सहभागी होत असताना जिल्हा परिषदेचे कामकाज मात्र सुरळीत सुरु राहणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *