![]()
ओम शब्दात खूप मोठी ताकद आहे. या शब्दात भरभरुन आनंद जोडला गेला आहे. त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली तरी चाळीस टक्के शक्ती ही नेहमी आपल्या हातातच असते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबईचे
.
प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या स्थानिक युनीटतर्फे एक विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. सचिन परब बोलत होते. ते म्हणाले, आपल्या मनगटात असलेल्या शक्तीच्या आधारावर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करून विजय प्राप्त करू शकतो. भारत हा प्राथमिक व माध्यमिक शाळेत तयार होतो. त्यासाठी शिक्षक हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या मते तुम्ही दुसऱ्यांना प्रसन्न कराल तर तुम्हीसुद्धा प्रसन्न रहाल एकमेकांना समजून घ्या व भावनांवर नियंत्रण ठेवा. सलग तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे आयोजन गजानन महाराज मंदिर परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी सीता दीदी, युवा उद्योजक नवीनकुमार पेठे, नंदू नानोटकर, सुनील पकडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, डॉ. मुंदडा, नंदकिशोर चिखले, डॉ. श्याम राठी, डॉ. योगेश पोके, अंगनानी, स्नेहा पोके, वसतीगृहाच्या गृहपाल सानिका मंचावर उपस्थित होत्या. डॉ. परब पुढे म्हणाले की सध्या जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थिती असल्याने अशा तणावपूर्ण वातावरणात राज योगाचे मेडिटेशन हे खूप उपयोगी पडणारे आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा दुपट्टा, फोटो फ्रेम व प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोर्शी ब्रह्माकुमारीज सेंटरच्या संचालिका पारी दीदी यांनी केले. तर आभार डॉ. स्वप्नील सोनोने यांनी मानले.या कार्यक्रमाला डॉ. दीपक ढोले, प्रदीप खोडसकर, जयकुमार गट्टानी, श्रीराव यासह मोर्शी शहरातील राजकीय मंडळी, पत्रकार, व्यवसायिक, महिला भगिनी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जया दीदी, पिंकी दीदी, रूपाली दीदी, वसंत कुंभारे, संजय गांगडे, शरणजीत भाई,कृ ष्णा भाई, शेखर भाई इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.