![]()
दोन दिवसांपूर्वी हनुमाननगरात गावठी कट्टा आणि बिअरची बॉटल नाचवत गोळीबार करणाऱ्या पवन दिवेकर व त्याच्या पीडी कंपनीवर अखेर पोलिसांनी कारवाई केली. गुंडांवर पोलिस कसे भारी पडतात, याचा प्रत्यय शनिवारी (१८ एप्रिल) रात्री आला. अवघ्या ४८ तासांपूर्वी ज्या चौका
.
गुंड जेलमधून सुटल्यावर शस्त्रांसह रील्स बनवून दहशत माजवत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले होते. यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी घटनास्थळी तपास केला. “हे रीलस्टार नसून गुंड आहेत. यांच्यासोबत व्हिडिओ काढू नका. असे पोलिसांनी या वेळी सांगितले.
पोलिसावरच उगारला होता चाकू
दरम्यान, अटकेच्या वेळी पवन दिवेकरने पळून जाण्याच्या प्रयत्नात फौजदार अर्जुन राऊत यांना ढकलून दिले. तसेच, एका पोलिसावर चाकू उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.