Headlines

सातारा गुन्हेगारी वार्ता:इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह व्हिडीओवरून साताऱ्यात गुन्हा




सोशल मीडियावर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे नऊच्या सुमारास पोवई नाका परिसरात असताना ‘Adorable Vidzee’ आणि ‘Insta Satara’ या इन्स्टाग्राम खात्यांवरून संबंधित व्हिडीओ प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले. तक्रारीनुसार, व्हिडीओमध्ये हिंदू धर्मीय जानेवारी ते जुलैदरम्यान मांसाहार करतात आणि श्रावण महिन्यात महादेवाचे गाणे म्हणत भक्तीचे ढोंग करतात, अशा आशयाचे चित्रण करण्यात आले होते. तसेच हिंदू धर्मीयांना उद्देशून आक्षेपार्ह टॅगलाईन वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे नमूद करत संतोष राजाराम पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विद्या खोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे तपास करीत आहेत. साताऱ्यात रस्त्यावर राखी स्टॉलचा अडथळा; दोघांवर स्वतंत्र गुन्हे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्त्यावर राख्यांचे स्टॉल उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेसमोरील रस्त्यावर स्टॉल लावल्याच्या प्रकरणात चंद्रकांत भगवान पवार आणि संजय जनार्दन पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 22 ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास चंद्रकांत पवार यांनी ‘सिद्धिविनायक’ नावाचा राखी विक्रीचा स्टॉल सार्वजनिक रस्त्यावर उभारला होता. त्यामुळे वाहनांची ये-जा तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. स्टॉल हटविण्यास सांगूनही त्यांनी नकार दिला आणि मोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल स्वप्निल सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार पाटोळे तपास करीत आहेत. दरम्यान, याच ठिकाणी ‘वैष्णवी क्रिएशन’ नावाचा राखी स्टॉल उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सातारा हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय जनार्दन पवार (वय 50, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्टॉल हटविण्यास सांगितल्यानंतरही नकार देत गोंधळ घातल्याचा आरोप आहे. पोलिस कॉन्स्टेबल रोहित बाजारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार पोळ तपास करीत आहेत. वाढेतील मोबाईल टॉवरवर चोरी; VI ची सहा RUS कार्ड गायब वाढे (ता. जि. सातारा) येथील इंडस मोबाईल टॉवरमधून VI नेटवर्कची सहा RUS कार्ड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमारे 12 हजार रुपये किमतीच्या या कार्ड चोरीप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इंडस मोबाईल टॉवर क्रमांक IN 1274135 येथे 8 ऑगस्ट रोजी पहाटे 1.40च्या सुमारास चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित कंपनीची परवानगी नसताना अज्ञात व्यक्तीने टॉवरमधील सहा RUS कार्ड काढून नेल्याचा आरोप आहे. याबाबत मनोज शंकर शहापुरे (वय 44) यांनी 22 ऑगस्ट रोजी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरीस गेलेल्या कार्डांची किंमत सुमारे 12 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक वायदंडे करीत आहेत. अजिंक्यतारा पायथ्याशी गांजा सेवनाचा आरोप; 21 वर्षीय तरुणावर गुन्हा अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी स्मृती उद्यान परिसरात अमली पदार्थाचे सेवन केल्याच्या आरोपावरून सातारा शहर पोलिसांनी 21 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौद अहमद खान (रा. शाहूनगर, जगतापवाडी, कोडोली, सातारा) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. 22 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास स्मृती उद्यान-अजिंक्यतारा पायथा रोड परिसरात सौद अहमद खान हा गांजाचे सेवन करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस शिपाई अमोल बागल यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार जाधव करीत आहेत. पाचवडमध्ये शेडवर पोलिसांची धडक; 1.8 किलो गांजा सदृश पदार्थ जप्त पाचवड (ता. वाई) येथे घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला 1 किलो 800 ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ भुईंज पोलिसांनी जप्त केला. या पदार्थाची अंदाजे किंमत 37 हजार 800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. कृष्णा पुलाजवळ राहणाऱ्या किसन कणसे (वय 54) यांच्या घरामागील शेडमध्ये 22 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी पांढऱ्या पिशवीत पारदर्शक प्लास्टिकमध्ये हिरवी, सुकलेली पाने व गोळीसदृश पदार्थ आढळून आला. या पदार्थाला उग्र वास असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. कोणताही कायदेशीर परवाना नसताना आर्थिक फायद्यासाठी हा पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. पोलिस शिपाई आकाश कुंभार यांच्या फिर्यादीवरून किसन कणसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *