Headlines

पुणे शहरात दोन अपघातांत दोघांचा मृत्यू:मांजरी आणि वाघोली परिसरात घडल्या घटना




पुणे शहरात शनिवारी दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी आणि अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली परिसरात या घटना घडल्या. पहिला अपघात मांजरी येथील महादेवनगर परिसरात सकाळी नऊच्या सुमारास झाला. येथे एका ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली, यात अमित रमेश अवताडे (वय २४, रा. लोणी काळभोर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालक चंद्रकांत महादेव काळे (वय ४२) याला अटक करण्यात आली आहे. गणेश ज्ञानेश्वर अवताडे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमितला गंभीर दुखापत झाली होती आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरा अपघात पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली येथील भाडळे वस्ती परिसरात सकाळी आठच्या सुमारास घडला. एका दुचाकीने पादचारी सदाशिव नारायण भोजणे (वय ६५, रा. बकोरी रस्ता, वाघोली) यांना धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोजणे यांच्या पत्नी अन्नपूर्णा भोजणे (वय ६०) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंभीर जखमी झालेले भोजणे यांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक थोरात या प्रकरणाचा तपास करत आहेत. कात्रज भागात घरफोडी तीन सदनिकांमधून ऐवज चोरी कात्रज भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला. तीन सोसायट्यांमधील सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील मांगडेवाडी भागात ओम रेसिडन्सी, शिवालय काॅम्पेक्स, शिवालय सोसायटी आहे. चोरट्यांनी शनिवारी (२२ ऑगस्ट) दुपारी ओम रेसीडन्सी सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून एक लाख आठ हजारांचे दागिने लांबविले. याच परिसरातील सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी आणखी एका सदनिकेचे कुलूप तोडून एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. मांगडेवाडीतील तीन सोसायट्यांमधील सदनिकांमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *