Headlines

मोर्शीत विहिरीत आढळले वृद्ध महिलेचे प्रेत:काटपूर गावात खळबळ, पोलीस तपास सुरू




मोर्शी तालुक्यातील काटपूर (ममदापूर) गावात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी, २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मृत महिलेचे नाव सुमन किसनराव यावले असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यावले यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मृतदेह प्रवीण मधुकर यावले यांच्या शेतातील विहिरीत सकाळी आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिरखेडचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किसन धुर्वे, शेतमालक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील सरोजिनी यावले आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तो मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुमन यावले यांनी विहिरीत उडी घेऊन हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिरखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *