Headlines

संवाद:संविधानामुळे कोणताही तरुण मुख्यमंत्री होऊ शकतो- फडणवीस, तरुणांनी केवळ प्रेक्षक न राहता देशाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे




राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कायमच चर्चेत राहणाऱ्या ‘मंथन फॉर यूथ’ या विशेष कार्यक्रमात रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी केवळ राजकीय प्रवासावरच नव्हे, तर देशातील लोकशाही व्यवस्थेच्या खऱ्या आणि अफाट ताकदीवर मोठे भाष्य केले. आजच्या तरुण पिढीने देशाच्या जडणघडणीत कसे पुढे आले पाहिजे याचे महत्त्व त्यांनी या वेळी अधोरेखित केले. कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकप्रिय ठरलेल्या ‘नायक’ चित्रपटाचा रंजक दाखला दिला. चित्रपटाच्या कथेत अनिल कपूर केवळ एका दिवसासाठी मुख्यमंत्री होतात आणि सिनेमॅटिक कथेनुसार त्यांना तात्पुरता अधिकार मिळतो, असे नमूद करत त्यांनी वास्तवातील लोकशाहीचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, चित्रपट किंवा नाटकांप्रमाणे केवळ एका दिवसासाठी नव्हे, तर आपल्या देशातील संविधान आणि लोकशाही व्यवस्थेमुळे कोणताही सामान्य तरुण किंवा कोणतीही व्यक्ती खऱ्या अर्थाने राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकते. लोकशाहीत कोणा एका राजघराण्यापुरते किंवा विशिष्ट कुटुंबापुरते अधिकार मर्यादित नसतात, तर प्रत्येक सामान्याला पुढे जाण्याची, नेतृत्व करण्याची आणि सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची समान संधी असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. युवकांनी केवळ प्रेक्षक किंवा बाजूला उभे राहून टीका करणारे न राहता मोठ्या आकांक्षा बाळगून राज्याच्या आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत व विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी प्रयत्न मुलांमध्ये असलेल्या सर्वाधिक स्क्रीन टाइमबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे. स्क्रीनवरून मैदानावर कसे वळता येईल याबद्दलही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून निश्चित धोरण ठरवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. युवकांनी आव्हानांना न घाबरता स्वीकार करावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनी आव्हानांना न घाबरता नावीन्यपूर्ण कल्पनांचा स्वीकार करावा आणि प्रगतीचा मार्ग स्वतः निवडावा, असा सकारात्मक संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. युवा पिढी घडवण्यासाठी सक्रिय सहभाग याबद्दल युवकांना पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील मार्गदर्शन केले. नशामुक्त भारतअंतर्गत युवकांना दिली शपथ नशामुक्त भारत या अंतर्गत युवकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. यामध्ये अमली पदार्थमुक्त जीवनशैली या व्यसनापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा त्यासोबतच अमली पदार्थांचा वापर अथवा विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, अशी शपथ या वेळी देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *