![]()
छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या बसचा कन्नड घाटात स्टिअरिंगचा रॉड तुटून पुढील चाक निखळल्याने दरीच्या दिशेने घसरली. बसमध्ये ५० प्रवासी असल्याने क्षणातच प्रवाशांच्या काळजात धडकी भरली. चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावून बस दरीत कोसळण्यापासून रोखल
.
बस सुरतकडे जाण्यासाठी निघाली. वेरुळजवळ वाहतुकीची कोंडी झाल्याने तेथे बसला एक तास विलंब झाला. दुपारी एक वाजेच्या सुमारास बस कन्नड घाटात आली. जय मल्हार स्पॉटजवळ बसचे स्टिअरिंग ढिले झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याच वेळी स्टिअरिंग रॉड तुटून पुढील चाक निखळले. त्यामुळे बसचा ताबा सुटून ती घाटाच्या कडेला घसरत दरीच्या दिशेने जाऊ लागली.
नियंत्रण मिळवल्याने बस रोखली
घाटातील मल्हार स्पॉटजवळ स्टिअरिंग ढिले झाल्याचे लक्षात येताच बसचा वेग कमी करत ताशी २० किमीवर आणला. परंतु स्टिअरिंग रॉड तुटल्याने बस उतारामुळे दरीकडे घसरू लागली. ब्रेक लावून दरीच्या कठड्यावर बस थांबवली. -सुभाष पल्हाळ, चालक संभाजीनगर
अपघातामुळे घाटात ३ तास वाहतूक खोळंबली
बसच्या अपघातामुळे घाटातील वाहतूक ३ तास खोळंबली होती. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. बसचे मागील दोन चाके कठड्याला अडकल्याने बस पाच हजार फुट खोल दरीत जाण्यापासून वाचली.
स्टिअरिंग रॉड तुटल्यास गिअर हळूहळू कमी करा
- धावत्या वाहनाचा स्टिअरिंग रॉड तुटल्यास ॲक्सिलेटरवरील पाय त्वरित काढून घ्या, जेणेकरून वेग आपोआप कमी होऊ लागेल.
- वाहनाचे चारही इंडिकेटर चालू करा आणि सतत हॉर्न वाजवून सभोवतालच्या वाहनचालकांना धोक्याची पूर्वसूचना द्या.
- मॅन्युअल वाहन असल्यास क्लच न दाबता, न्यूट्रल न करता एकामागून एक गिअर कमी करा, यामुळे इंजिन ब्रेकिंगद्वारे वेग कमी होतो.
- एकदम जोरात ब्रेक दाबू नका, टप्प्याटप्प्याने ब्रेक दाबा, गाडीचा वेग ४०-३० किमी/तास झाल्यावर हँडब्रेक हळूहळू वर उचला.
- गाडी पूर्ण थांबेपर्यंत इंजिन बंद करू नका. इंजिन बंद केल्यास स्टिअरिंग लॉक होऊ शकते.
- बसची नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री तपासणी करूनच मार्गावर पाठवले होते. कन्नड आगाराचे तांत्रिक कर्मचारी अपघातस्थळी पाठवले होते. अपघाताचा अहवाल आल्यानंतर त्यामागील कारण स्पष्ट होईल. – स्वाती घोडे, आगारप्रमुख, छत्रपती संभाजीनगर