Headlines

अजितदादा हे पाहत असतील तर त्यांना आवडेल का?:बँक कर्मचाऱ्यांना प्रचाराला जुंपल्यावरून रोहित पवारांचा सवाल




पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या एका नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट पीडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पुणे जिल्ह्यातील एका नेत्याने आपल्या खांद्यावर भाजपाची पालखी घेतली आहे. पुणे विभाग पदवीधरची हक्काची जागा भाजपने अजित पवार गटाकडून हिसकावून घेतली असली, तरी आता या नेत्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजपच्याच प्रचाराला जुंपले आहे. बँक कर्मचाऱ्यांना प्रचाराला जुंपल्याचा आरोप रोहित पवार यांनी आरोप केला आहे की, ज्या पीडीसीसी बँकेची निवडणूक राष्ट्रवादीने भाजपविरोधात लढली होती, त्याच बँकेतील कर्मचाऱ्यांना आता संबंधित नेत्याच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे. या नेत्याने दोन दिवसांपूर्वी कोणालाही विश्वासात न घेता बँकेत बैठक घेतली. तिथे भाजपच्या पुणे शहरातील एका पदाधिकाऱ्याला भाषण करायला लावून संपूर्ण बँक भाजपच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर उमेदवाराच्या प्रचाराला जुंपल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, बँकेचा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीचा नेमका संबंध काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निष्ठेवर प्रश्नचिन्ह आणि पक्षांतराचा अंदाज ज्या पक्षाने या नेत्याला जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि राज्यात काम करण्याची संधी दिली, त्याच नेत्याकडून आता स्वार्थासाठी भाजपकडे ‘पाणी भरणे’ सुरू असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. ‘अजितदादा हे पाहत असतील तर ते काय विचार करत असतील? त्यांना हे आवडले असते का? हीच का या नेत्याची निष्ठा?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, उद्या हा नेता अजितदादा गट सोडून दुसऱ्या पक्षातून लढण्याची तयारी करत असल्याचा अंदाजही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याला खूश करण्यासाठीच बँकेचा वापर सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. बँक कर्मचाऱ्यांना थेट इशारा या प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी पीडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही थेट आवाहन आणि इशारा दिला आहे. संबंधित नेत्याचे बेकायदा आदेश पाळून भाजपचा प्रचार करणे त्वरित बंद करावे आणि शेतकऱ्यांना सेवा देण्याचे आपले मूळ काम योग्य प्रकारे करावे, असे ते म्हणाले. तसेच, नको त्या फंदात पडून चुकीचे काम केल्यास आमचेही तुमच्याकडे बारकाईने लक्ष आहे, असा इशारा त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना दिला आहे. रोहित पवारांनी केलेली पोस्ट.. ———————– हेही वाचा.. कर्नाटकचे मुख्यमंत्री बैठक घेतात, पण महाराष्ट्र सरकारला वेळ नाही: ऊस दरावरून राजू शेट्टींचा संताप, 25 ऑक्टोबरला काढणार भव्य रॅली
आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर उसाच्या दराचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. जोपर्यंत उसाचा दर निश्चित होत नाही, तोपर्यंत राज्यात उसाचे एक कांडंही तोडू देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि साखर कारखानदारांना दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी येत्या २५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात भव्य मोटरसायकल रॅली काढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *