Headlines

आम्ही प्रतापसिंह पाटील यांच्यासोबतच:रोज शब्द बदलला तर किंमत राहत नाही, जरांगे पाटलांनी ऐकवलेली क्लिप एआय मार्फत तयार केलेली- अब्दुल सत्तार




पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना पाठिंबा नसल्याची सुरुवात केली. मग यानंतर आम्ही राजकारणी आमच्या पद्धतीने कामाला लागलो असून, प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी कन्नड, वैजापूर, सिल्लोड, खुलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फिरलो आहोत. त्यानंतर जर आपली भूमिका बदलली, तर पक्षाची प्रतिमा मलिन होते. पक्षाबाबत धोरणात्मक निर्णय घेतला की त्यावर ठाम राहावे लागते. आपण रोज शब्द बदलला, तर आपल्या शब्दाला किंमत राहत नाही आणि एकदा बोलण्याची किंमत संपली की लोक दुसऱ्यांदा विश्वास ठेवत नाहीत. म्हणूनच आम्ही प्रतापसिंह पाटील यांच्यासोबत आहोत आणि 27 तारखेला गुलाल अंगावर घेण्यासाठी सुद्धा जाणार आहोत, असे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असून, सकाळपासून होत असलेल्या मतदान प्रक्रियेतून ते दिसून येत आहे. जसे जसे मतदान पुढे जाईल, तसे मतप्रवाह आणि चर्चा समोर आल्यावर अंदाज बांधता येईल. मात्र, मतदार ज्या पद्धतीने गुप्तपणे मतदान करत आहेत, ते पाहता बदल निश्चित होईल असे वाटते. हा बिनबुडाचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या क्लिपविषयी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेली क्लिप ही एआयमार्फत तयार करण्यात आली आहे. यात काही राजकारण असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी होईल. त्यांना ही क्लिप कोणी आणून दिली, कशा पद्धतीने, कोणी आणि कशामुळे दिली, तसेच ही क्लिप दाखवण्यामागची पार्श्वभूमी काय होती, याची सखोल चौकशी केली जाईल. चौकशी झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, हा एक बिनबुडाचा आरोप आहे. शिंदेंना बदनाम करण्याचा कट अब्दुल सत्तार म्हणाले की, भविष्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत, यासाठी त्यांना बदनाम करण्याचा काही कट असावा, ज्याचा शोध घेतला जाईल. यानंतर आमचे नेते अधिकृतपणे यावर उत्तर देतील. या आरोपांमध्ये आम्हाला कोणतेही तथ्य वाटत नाही. ही क्लिप व्हायरल करण्यामागे नेमके काय षडयंत्र आहे, याचाही तपास केला जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *