![]()
एकीकडे देशाला ‘महासत्ता’ बनवण्याची आणि ‘विकसित भारत’ची स्वप्ने दाखवली जात असताना, दुसरीकडे जागतिक भूक निर्देशांकात भारताची १०० व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘भाषणांनी पोट भरत नाही आणि जाहिरातींनी कुपोषण मिटत नाही, हे सरकारच्या कधी लक्षात येणार?’ असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. ‘महासत्ते’चे स्वप्न आणि कुपोषणाचे वास्तव देशातील भीषण वास्तवावर बोट ठेवताना रोहित पवार म्हणाले, “एका बाजूला देशाला ‘महासत्ता’ बनवण्याची खोटी स्वप्ने विकून सत्ता मिळवली जाते, तर दुसऱ्या बाजूला देशातील प्रत्येक दहाव्या व्यक्तीच्या पोटात भुकेचा आगडोंब उठलेला असतो. देशातील ५ वर्षांखालील २९ टक्के बालकांची वाढ केवळ कुपोषणामुळे खुंटली आहे. याच कारणामुळे १२२ देशांच्या जागतिक भूक निर्देशांकात भारत तब्बल १०० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.” ‘मोफत रेशन देणे अभिमानास्पद की लज्जास्पद?’ केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला. “देशातील ७९ कोटी लोकांना मोफत रेशन देत असल्याचे सांगत केंद्र सरकार स्वतःचीच पाठ थोपटून घेते. पण हा अभिमानाचा विषय आहे की लज्जास्पद, हेच सरकारला कळत नाही. एवढे करूनही देशात लोक उपाशी आहेत. ‘विकसित भारत’च्या ढोल-ताशांमध्ये देशातील १० टक्के लोकांच्या पोटातील भूक सरकारला कधी दिसणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘मन की बात’पेक्षा ‘जन की बात’ ऐका रोहित पवार म्हणाले, कधीतरी जाती-धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आणि ‘मन की बात’पेक्षा ‘जन की बात’ ऐकून, माणूस म्हणून सरकार या गरिबांच्या भुकेचा विचार करणार आहे की नाही?”
———————– हेही वाचा.. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान:182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार, कोण मारणार बाजी? 27 ऑक्टोबरला मतमोजणी राज्यातील विधान परिषदेच्या बहुचर्चित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार, २३ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) या विभागांमधील एकूण ५ मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होत असून, तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. अनेक मतदारसंघांमध्ये प्रस्थापित विरुद्ध बंडखोर अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. २७ ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सविस्तर वाचा
Source link
79 कोटी लोकांना मोफत रेशन देणे अभिमानाची गोष्ट की लज्जास्पद?:रोहित पवारांचा केंद्राला सवाल, ‘विकसित भारत’च्या दाव्यांवरून निशाणा