Headlines

Sanjay Shirsat Demands Forensic Probe Into 500 Crore Audio Clip Controversy


“राज्यात सध्या गाजत असलेली 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराची ऑडिओ क्लिप हा अत्यंत गंभीर विषय असून, महायुतीमध्ये एकमेकांचे कपडे फाडण्याची कोणतीही स्पर्धा सुरू नाही. मात्र, या गुप्त संभाषणात आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खा

.

छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर, महायुतीमधील समन्वयावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच विरोधकांच्या टीकेवर सडेतोड भाष्य केले.

फॉरेन्सिक तपासणीनंतर सत्य बाहेर येईलच

ऑडिओ क्लिप प्रकरणावर सविस्तर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “ही केवळ 500 कोटींच्या येण्या-जाण्यापुरते मर्यादित नसून यामध्ये अनेक गोष्टी इनव्हॉल्व्ह आहेत. एवढी सिनेट कॉन्फरन्स कॉलवरील टेप बाहेर कशी आली, याचे मोठे आश्चर्य वाटते. यातील चारही पैकी एकाही व्यक्तीने अद्याप ‘हा आमचा आवाज नाही’ असे स्पष्ट केलेले नाही, त्यामुळे संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे.”

मुख्यमंत्री पातळीवर गंभीर दखल

“शिवसेनेने स्वतःहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे, कारण आमच्या सर्वोच्च नेत्यावर विनाकारण आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एकदा फॉरेन्सिक अहवाल येऊ द्या, त्यानंतर ज्याचे नाव पुढे येईल आणि ज्याने कोणी हे कारस्थान रचले असेल, त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही.”

आमच्यात कपडे फाडण्याची स्पर्धा नाही

“काही लोकांना महायुतीत वाद झाल्याचा आणि घर जळताना पाहून असुरी आनंद होत असेल, पण आमच्यात कोणतीही कपडे फाडण्याची स्पर्धा सुरू नाही. महायुतीमध्ये कोणताही वाद होणार नाही.”

शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला आणि भलतेच राजकारण सुरू

राज्यातील वास्तव परिस्थितीवर बोट ठेवत शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले. “राज्यात 670 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असून लोक गावे सोडत आहेत, भूकेने मरत आहेत. जनतेचे हे खरे प्रश्न बाजूला पडले असून सध्या एक वेगळीच राजकारणाची दिशा सुरू झाली आहे. हे सगळं आता थांबलं पाहिजे.”

केंद्राकडून मदत मागणे भीक मागणे नव्हे

“महाराष्ट्रातून केंद्र सरकारला सर्वाधिक रेव्हेन्यू मिळतो. त्यामुळे संकटाच्या काळात केंद्राने मदत करणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि आमच्या हक्काची मदत मागणे हे आमचे कर्तव्य व अधिकार आहे. जे लोक यावर टीका करतात, त्यांनी राजकारणात नसताना आधी स्वतःकडे पाहावे.”

पोलिसांच्या कारभारावर तातडीने बैठक घेणार

छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विचारले असता ते म्हणाले, “संभाजीनगरमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत आणि काही तक्रारींच्या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. येत्या एक-दोन दिवसांत मी आयुक्तांची आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक बोलावणार असून शहरातील सुरक्षेचा व सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला जाईल.”

————————————————

हेही वाचा…

सूत्राच्या जिवाची हमी दिली तर शिंदे-फडणवीसांना क्लिप देतो!:मनोज जरांगे म्हणाले- षड्यंत्र उघड केल्याने आता दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील

“गोरगरीब मराठा समाजाच्या आणि माझ्या राजकीय अस्तित्वाच्या विरोधात पडद्यामागे नेमके किती भयंकर कटकारस्थान शिजत होते, हे मी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आणले आहे. स्वतःचा हा मोठा अपराध झाकण्यासाठी आणि सत्य पचवण्याची हिंमत नसल्याने आता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन माझ्या मागे लागतील, अशी दाट शक्यता आहे. मात्र, या सर्व राजकीय ताकदीला मी एकटाच पुरून उरेन! विशेष म्हणजे, माझी पत्रकार परिषद होण्याच्या 2 तास आधीच केवळ श्रीकांत शिंदेंच्या 500 कोटींच्या उल्लेखाची क्लिप टीव्ही चॅनेलवर रामदास कदमांनी वाजवली; मग एकनाथ शिंदेंची खरी बदनामी मी केली की रामदास कदमांनी?” असा खडा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.