Headlines

‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’; वाळवंटात 23 टन कचरा संकलन:नगराध्यक्षा भालके स्वच्छता मोहिमेत सहभागी; सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎



चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराचे पावित्र्य जपण्यासह स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ उपक्रमाला बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विशेष स्वच्छता मोहिमेत ल

.

पंढरपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या दृष्टीने चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. याच उद्देशाने नगरपरिषदेने दर बुधवारी ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. या अभियानात पंढरपूर नगरपरिषदेसह पालवी संस्था, कवठेकर प्रशाला नाथ चौक, विठ्ठल-रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, वेदांत गुरुकुल, क्रेडाई पंढरपूर, तिरुपती कन्स्ट्रक्शन, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेने सहभाग घेतला.

नगरपरिषदेच्या प्रशासन, बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना, संगणक, आरोग्य, विद्युत, भांडार, उद्यान तसेच लेखा व कर विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही स्वच्छता मोहिमेत योगदान दिले. मुख्याधिकारी महेश रोकडे, नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसरात ‘स्वच्छतेतून विठ्ठल सेवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी २३ टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केवळ प्रशासनाला सूचना न देता प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागातून लोकप्रतिनिधींनी सामाजिक उपक्रमांमध्ये कृतीतून पुढाकार घेण्याचा संदेश दिला. संकलित केलेल्या २३ टन कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. चंद्रभागा वाळवंट स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्यासाठी सामाजिक, राजकीय संघटना तसेच नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.

नागरिकांनीही उपक्रमात सहभाग घ्यावे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *