Headlines

दाभरूळ फाट्यावर भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली; 8 प्रवासी जखमी:ट्रॅव्हल्सचालकाचा वाहनावरील ताबा सुटला, पाचोड ठाण्यात गुन्हा दाखल‎



धुळे-सोलापूर महामार्गावर दाभरूळ फाटा येथे ट्रॅव्हल्सने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

.

बीडच्या दिशेने ट्रक (आरजे ०२ जीसी ३५९५) जात होता. त्यावेळी ट्रॅव्हल्सच्या (एआर ११ एल ९०२१) चालकाचा दाभरूळ फाट्याजवळ वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ही ट्रॅव्हल्स पुढे जाणाऱ्या ट्रकच्या पाठीमागील भागावर आदळली.

अर्धा तास वाहतूक खोळंबली : घटनास्थळाची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात असून, ट्रॅव्हल्सच्या चालकाचा दाभरूळ फाट्याजवळ ताबा सुटल्याने अपघात झाला. अर्धा तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *