![]()
पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या ऑपरेशन कवच अंतर्गत नशेला नकार, जीवनाचा स्वीकार या संदेशाच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधी जनजागृती करण्यासाठी २२ रोजी शेंदुरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील
.
या स्पर्धेमध्ये जनता गर्ल्स व जनता हायस्कूल, शेंदुरनाघाट; शासकीय आदिवासी आश्रम शाळा, वाई खुर्द; प्रेमराज दौलतराव शेळके हायस्कूल, वाई खुर्द; प्रभात हायस्कूल, पुसला; तसेच जिजामाता हायस्कूल, पुसला येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व, युवकांना सकारात्मक संदेश तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करणारे विविध आकर्षक पोस्टर तयार केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे परीक्षण करून पोस्टरना क्रमांक देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला शेंदुरजनाघाट नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, नगराध्यक्ष सुवर्णा वरखेडे, ठाणेदार राहुल गवई ,जनता गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माया हिवसे, नगरसेविका माधुरी माहोरे, नगरसेवक ओमप्रकाश कांडलकर, निलेश फुटाणे, विशाल सावरकर, पवन मोघे, शेख नासीर, विजय चौधरी, इत्तेखार अहमद, नेपाल पाटील, शिक्षकवृंद व विद्यार्थी, पोलीस स्टेशनचा स्टाफ यावेळी उपस्थितीत होता. अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करून युवकांनी व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन कवच” या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करून “नशेला नकार, जीवनाचा स्वीकार” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.विद्यार्थ्यांच्य ा कलागुणांना व्यासपीठ देत “तुमची कला, समाजासाठी महत्त्वाचा संदेश” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.