Headlines

मागण्या फक्त कागदावर नव्हे, प्रत्यक्षात लागू झाल्या पाहिजे:आरटीओ कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर‎




कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या कागदावर किंवा आश्वासनांपुरत्या मर्यादित न राहता त्या लागू झाल्याच पाहिजेत, असा इशारा मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेचे नवनिर्वाचित राज्य उपाध्यक्ष तथा हंगामी कार्याध्यक्ष अनिल मानकर यांनी दिला आहे. लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महाअधिवेशन आणि आमसभेत अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष अनिल मानकर यांची राज्याच्या उपाध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर हंगामी कार्याध्यक्षपदाची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. लातूर शहरातील या अधिवेशनाला राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेचे मावळते अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांच्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर उपस्थितांसोबत बोलताना, अनिल मानकर यांनी स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्यातील सर्वांनी पक्ष, गट-तट आणि मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने संघर्ष करणे गरजेचे आहे. संघटित ताकदीच्या जोरावर सनदशीर मार्गाने हा लढा कायम ठेवण्याचा संकल्प त्यांनी या वेळी व्यक्त केला. कार्याची दखल घेवून निवड ः लातूर येथे २२ ऑगस्टला झालेल्या महाअधिवेशनादरम्यान राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडीत अनिल मानकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड केली. संघटनेची महत्त्वाची हंगामी कार्याध्यक्षपदाची धुराही त्यांच्याकडे सोपवली. निवडीची घोषणा होताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी करून अनिल मानकर यांचे अभिनंदन केले,अशी माहिती मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *