Headlines

कोल्हापुरात पोल्ट्री फार्ममध्ये ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त:5 ते 6 जणांना अटक,1 कोटी 13 लाखांचा मुद्देमाल जप्त




कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हाजगोळी गावच्या हद्दीत पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेला MD ड्रग्स निर्मितीचा गुप्त कारखाना अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने उद्ध्वस्त केला. पुणे येथील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाने शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. या कारवाईत तयार MD ड्रग्ससह ड्रग्स निर्मितीसाठी वापरले जाणारे रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य असा एकूण 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पोल्ट्री मालकासह स्थानिक चौघे, मुंबईतील तिघे आणि बेळगाव येथील दोघे अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 5 ते 6 जणांना अटक झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तपासातून कारखान्याचा पर्दाफाश मीरा रोड येथील नया नगर पोलिस ठाण्यात सुमारे 2 कोटी रुपये किमतीच्या ड्रग्स तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी इरफान खान या तरुणाला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे पप्पू मालवडकर यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये अमली पदार्थांचे उत्पादन सुरू असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पथकाने पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोल्ट्री फार्ममध्ये गुप्तपणे सुरू असलेला ड्रग्स निर्मितीचा कारखाना आढळून आला. पोलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त करत घटनास्थळावरून सुमारे 208 ग्रॅम तयार MD ड्रग्स, 70 लिटर मोनोमिथाईल अमाईन, 2-ब्रोमो केमिकल पावडर आणि ड्रग्स निर्मितीसाठी वापरले विविध रसायने आणि कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हिटर, मिक्सर आणि ड्रिलसदृश मशिनरीचा समावेश होता. हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले. नऊ जण ताब्यात; रॅकेटची साखळी उघड होण्याची शक्यता या कारवाईत पोल्ट्री मालकासह स्थानिक चौघे, मुंबईतील तिघे आणि बेळगाव येथील दोघे अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 5 ते 6 जणांना अटक झाल्याचीही माहिती समोर आली आहे. पोल्ट्री फार्ममध्ये तयार होणारे अमली पदार्थ कुठे आणि कोणाला पुरवले जात होते, तसेच या ड्रग्स रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सकडून सुरू आहे. त्यामुळे या कारवाईतून ड्रग्स रॅकेटची आणखी मोठी साखळी समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा.. नागपूरच्या गोधनी जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिन गॅस गळती:40 जण रुग्णालयात दाखल, 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर; 12 जणांना डिस्चार्ज
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन गॅसची गळती झाल्याने खळबळ उडाली आहे. या गॅसच्या संपर्कात आल्याने 40 हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला असून, 15 पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *