Headlines

पुण्यात प्रारूप मतदार यादीतून तब्बल 14.85लाख नावे वगळली जाण्याची शक्यता:मतदारसंख्या 34.65 लाखांवरून 19.80 लाखांवर येण्याचा अंदाज; हडपसरमध्ये सर्वाधिक घट




पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार यादीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) तब्बल 14 लाख 85 हजार मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील एकूण मतदारसंख्या 34.65 लाखांवरून सुमारे 19.80 लाखांवर येण्याचा अंदाज आहे. पुणे शहरात वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या या मतदारसंघांमध्ये 34 लाख 65 हजारांहून अधिक मतदार नोंदणीकृत आहेत. एसआयआरनंतर ही संख्या अंदाजे 19 लाख 80 हजारांवर येईल. या संभाव्य बदलांमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. येथे सुमारे 2 लाख 18 हजार मतदारांची नावे वगळली जाऊ शकतात. खडकवासला आणि कोथरूड मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात नावे कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याउलट, कसबा पेठ मतदारसंघात सर्वात कमी, म्हणजे सुमारे 12 हजार 585 मतदारांची नावे वगळली जाण्याचा अंदाज आहे. एसआयआरपूर्वीच्या आकडेवारीनुसार, वडगाव शेरीमध्ये सुमारे 46.63 टक्के, शिवाजीनगरमध्ये 44.47 टक्के, कोथरूडमध्ये 46.29 टक्के, खडकवासल्यात 40.15 टक्के, पर्वतीत 46.63 टक्के, हडपसरमध्ये 45.83 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये 40.46 टक्के आणि कसबा पेठमध्ये 35.25 टक्के मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी प्रारूप यादीवर आधारित असून, ती संभाव्य आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रत्यक्षात किती मतदारांची नावे वगळली जातात, हे स्पष्ट होईल. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या कमी झाल्यास आगामी निवडणुकांपूर्वी पुण्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा निश्चित परिणाम होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *