Headlines

लाडक्या बहिणींना रक्षाबंधन भेट; 1,500 रुपये जमा होणार:344.74 कोटी वितरित करण्यास मान्यता




‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अधिक गतिमान केली आहे. येत्या शुक्रवारी असलेल्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थींसाठी ३४४.७४ कोटींचा निधी वितरित करण्यास सोमवारी अधिकृत मान्यता देण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. रक्षाबंधन सणाची भेट म्हणून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै २०२६ या महिन्याचा १,५०० रुपयांचा थकीत हप्ता जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तब्बल १ कोटी ६५ लाख महिलांना येत्या आठवडाभरात थेट डीबीटीद्वारे हा निधी हस्तांतरित केला जणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२६-२७) अनुसूचित जाती घटकांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ३,००० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जुलै महिन्याच्या लाभासाठी ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांकडे अर्थसंकल्पीय प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जांची छाननी करून केवळ पात्र लाभार्थींच्या खात्यातच पैसे जमा केले जातील. ६२ लाख बहिणींना प्रतीक्षा सध्या १ कोटी ६५ लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या. पडताळणीत आतापर्यंत ९२.१० लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्या आहेत. मात्र पडताळणीचा सर्वाधिक फटका ई-केवायसी अपूर्ण राहिलेल्या ६२ लाख महिलांना बसला आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव आणि स्मार्टफोन नसल्यामुळे या महिला तांत्रिक कारणास्तव योजनेपासून वंचित राहिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *