![]()
शिव पार्वते शिव हर हर महादेव…च्या जय घोषामध्ये,श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी माचणूर येथे पहाटेपासून शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे श्रींची पूजा वैभव पुजारी यांच्या हस्ते केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले के
.
पहाटेची महापूजा करण्यात आली, दिवसभरात भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांनीही सिद्धेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पालखीचा छबिना करण्यात आला . यावेळी छबिन्याचा मान मंदिराचे पुजारी अण्णासो पुजारी यांच्याकडे होता. श्रावणमासानिमित्त श्री क्षेत्र माचणूर (ता. मंगळवेढा) येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी, समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने दि.१३ ऑगस्ट ते दि. १३ सप्टेंबर पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणमास अनुष्ठान सोहळ्यानिमित्त महिनाभर विविध नामवंत गायक, भजनी मंडळे व संगीत क्षेत्रातील कलाकारांच्या उपस्थितीत संगीत भजन, शिवस्तुती व भावगीतांचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यामुळे माचणूर परिसरात श्रावणमासात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. कै. शिवानंद मोरडे यांच्या स्मरणार्थ बसवराज रामलिंग मोरडे (रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) यांच्यावतीने वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.
मंगळवेढ्यातील काशीविश्वेश्वर मंदिरात भाविकांच्या रांगा मंगळवेढा शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात सोमवारी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पहाटेपासूनच रांग लावून दर्शन घेत होते. श्रावण मास असल्यामुळे दर सोमवारी मंदिरात सजावट केली जाते. शहरातील विविध भागातून भाविक दिवसभर दर्शनासाठी येत होते. सायंकाळी मंदिरात भाविकांची गर्दी लोटली होती. मंदिराची पूजाअर्चा एकनाथ गुरव व बाबा गुरव करतात.