![]()
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने करमाळा तालुक्यातील गुळसडी लगत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या फार्म हाऊसवर रविवारी (दि. २३ ऑगस्ट) भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तब्बल ३७८ बैलगा
.
भव्य बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आबा गुळवे, प्रशांत पाटील, अण्णासाहेब ढाणे, योगेश दळवी, पंचायत समिती करमाळ्याचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, सदस्य चंद्रकांत काका सरडे, भरत अवताडे यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत योगेश भगत, बारामती व सागर भाऊ थोरात यांच्या ‘हिंदकेसरी लखन’ आणि ‘कुमार कार्तिक शेठ, बदलापूर व राजे फार्म संभाजी राजे भोसले, ‘ मुरूम’ यांच्या ‘चिक्या’ या बैलजोड्या संयुक्तपणे प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. त्यांना १ लाख ५५५ रुपये बक्षीस देण्यात आले. हेमंत आबा घोलप पाटील व मोहम्मद अली रिस्क ग्रुप, कराड यांच्या ‘लाडका राहुल्या’ आणि सार्थक विजय पाटील यांच्या ‘सर्जा’ या बैलजोड्यांनी द्वितीय क्रमांक पटकावत ८५ हजार ५५५ रुपये बक्षीस मिळवले. शिवन्या ढेरे, देवळाली व मानसी योगेश भंडारे यांच्या ‘बलमा’ आणि मोईन शेख यांच्या ‘मन्या भाई’ यांनी तृतीय क्रमांक मिळवत ६५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस पटकावले. विजेत्यांना निमगाव (टे)चे सरपंच यशवंत शिंदे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. चौथ्या क्रमांकासाठी ४५ हजार ५५५ रुपये, पाचव्या क्रमांकासाठी ३५ हजार ५५५ रुपये, सहाव्या क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपये, सातव्या क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये, आठव्या क्रमांकासाठी ११ हजार ५५५ रुपये, तर नवव्या क्रमांकासाठी १० हजार ५५५ रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. ‘एक बैल एक दुसा’ मैदानात एकूण ३७८ बैलजोड्यांच्या मालकांनी सहभाग घेतला होता. पहिल्या पात्रता फेरीत ७ बैलजोड्यांचा एक गट करून ५४ फेऱ्यांतून ५४ जोड्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या फेरीत २ जोड्यांचा एक गट करून २७ फेऱ्यांतून २७ जोड्या तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरल्या. त्यानंतर ३ जोड्यांचा एक गट करून ९ फेऱ्यांतून अंतिम ९ जोड्यांची निवड झाली. याप्रसंगी बाबाराजे जगताप, मानसिंग खंडागळे, सुजित बागल, गणेश सरडे, सोमनाथ रोकडे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, तानाजी झोळ, रवींद्र वळेकर, गोरख गुळवे आदी उपस्थित होते. याशिवाय सेमी फायनल आणि क्वार्टर फायनलमध्ये विजेत्या बैलजोड्यांसाठी स्वतंत्र बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली होती.