पुण्यातील सिंहगड रोडवरील आनंदनगर परिसरात पीएमपीएमएल बसमधून पडलेल्या 25 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास वूड प्लाझा दुकानासमोर ही घटना घडली. कांचन बसच्या पुढील दरवाजातून उतरत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि
.
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव कांचन बाळवंत खड्डा (वय 25, मूळ रा. हनुमानगड, राजस्थान) असे आहे. कांचन यांनी IIT-BHU मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्या सध्या खडकवासला परिसरातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (DIAT) येथे सेमीकंडक्टर चिप डिझाइन विषयात MTechच्या दुसऱ्या वर्षात शिकत होत्या. त्या DIATच्या वसतिगृहात राहत होत्या.
सोमवारी सकाळी कांचन प्रात्यक्षिक सत्रासाठी खडकवासला येथून दिघीतील DRDO प्रयोगशाळेकडे PMPML बसने जात होत्या. सकाळी प्रवास करत असतांनात्या बसच्या पुढील दरवाजातून खाली पडल्या. त्याचवेळी PMPML बसला ओव्हरटेक करणाऱ्या स्कूल बसखाली त्या आल्या. अपघातानंतर कांचन यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे PMPML बसमधील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास अशा दुर्घटनांचा धोका वाढत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
सिंहगड रस्त्यावर ब्रह्मा हॉटेलसमोर खानापूर-स्वारगेट पीएमपीएमएल बसमधून पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक आणि मन सुन्न करणारी असल्याचे त्यांनी म्हटले. मृत तरुणीला श्रद्धांजली अर्पण करत तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील अपुऱ्या सेवेचा हा परिणाम असल्याचे सांगत सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पीएमपीएमएल प्रशासनाकडे संबंधित मार्गावरील बसफेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली. बसमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच मृत तरुणीच्या कुटुंबीयांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पोलिसांचे स्पष्टीकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन ‘डीआयएटी’च्या कृष्णा हॉस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक असल्याने ती खडकवासला येथून पीएमपीएमएल बसने निघाली होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर बस थांबली. कांचन बसच्या पुढील दरवाजातून उतरत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती रस्त्यावर पडली.
त्याचवेळी स्वारगेटच्या दिशेने जाणारी स्कूल बस तिच्या अंगावरून गेली. या अपघातात कांचन गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने हिंगणे खुर्द परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्रकृती गंभीर झाली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन ‘डीआयएटी’च्या हॉस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील ‘डीआरडीओ’च्या प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक असल्याने ती खडकवासला येथून पीएमपीएमएल बसने निघाली होती. सकाळी पावणेदहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर बस थांबली. कांचन बसच्या पुढील दरवाजातून उतरत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती रस्त्यावर पडली.
त्याचवेळी स्वारगेटच्या दिशेने जाणारी स्कूल बस तिच्या अंगावरून गेली. या अपघातात कांचन गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने हिंगणे खुर्द परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्रकृती गंभीर झाली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा..
पुण्यात दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांचं लग्न:समलैंगिक विवाहासाठी लग्नाच्या पत्रिकेसह प्रशासनाकडे केला रजेचा अर्ज, एकीवर लिंगबदलाचे उपचार सुरू

पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी विवाहासाठी पोलिस प्रशासनाकडे रजेचा अर्ज सादर केला असून, ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, पोलिस भरतीदरम्यान झालेली त्यांची ओळख पुढे नात्यात बदलली आणि आता दोघींनी एकत्र आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.सविस्तर वाचा..