![]()
जून व जुलै महिन्यात कळवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चणकापूर व पुनद प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीला पूर आला. या पुरामुळे जुनी बेज शिवारातील नदीलगतच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, पिकांचे नुकसान झाले आहे. सिमेंट
.
या प्रश्नावर जुनी बेजचे सरपंच सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली. गिरणा नदीच्या पुरपाण्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत ठराव करण्यात आला. बंधारा खचल्याने विहिरीचा भराव व शेतजमीन वाहून गेल्याने संरक्षक भिंत बांधणे अत्यावश्यक असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी आणि नदीलगत संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे व तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे सरपंच सुनील पवार, उपसरपंच मोनाली बच्छाव, बाजार समिती संचालक शितलकुमार अहिरे, माजी सरपंच संजय बच्छाव, सदस्य विजय खैरनार, भूषण बच्छाव व विनोद खैरनार यांनी केली आहे.
गावाच्या पाणीपुरवठा योजनेलाही धोका गिरणा नदीच्या पुरामुळे जुनी बेज शिवारातील सिमेंट काँक्रिट बंधाऱ्याचा कठडा खचला असून, बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे. बंधाऱ्यालगत असलेल्या जुनी बेजच्या पाणीपुरवठा विहिरीच्या आजूबाजूचा भरावही वाहून गेल्याने पाणीपुरवठा योजना धोक्यात आली आहे. त्यामुळे विहीर व पाणीपुरवठा योजनेच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.