![]()
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आयोगाने ही परीक्षा रद्द केली असली, तरी फुटलेला पेपर केवळ एकाच व
.
रोहित पवार म्हणाले की, पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यानिशी समोर आणला होता आणि तपास यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर आज तपासात पेपर लीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत हा पेपर 40-40 लाख रुपयांना विकला गेला हीच वस्तुस्थिती आहे, आणि आयोगालादेखील याची पूर्ण कल्पना आहे.
प्रकरण दडपल्यास गप्प बसणार नाही!
रोहित पवार म्हणाले की, एमपीएससीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता याचा संपूर्ण चौकशी अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा. आम्ही ज्या संशयित एजंट्सची नावे दिली होती, त्यांचे पुढे काय झाले? या प्रकरणात आयोगातील कोणाचा सहभाग आहे का आणि कोणाचा वरदहस्त आहे, हेदेखील स्पष्ट झाले पाहिजे. आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही शांत बसणार नाही.
एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
रोहित पवार म्हणाले की, एमपीएससीचा पेपर लीक होणे ही कोणतीही सर्वसामान्य घटना नसून अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा. तसेच, सरकारने या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची नेमणूक करावी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावर सरकारची अधिकृत भूमिका मांडून राज्यातील जनतेसमोर खरी वस्तुस्थिती आणावी, असे आवाहन रोहित पवारांनी केले आहे.
रोहित पवारांची पोस्ट काय?
आमदार रोहित पवार म्हणाले की, पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की,आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखे नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत 40 -40 लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे.
..तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही
आमदार रोहित पवार म्हणाले की,आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावे दिली होती त्यांचे काय झाले? आयोगातून कोणी सहभागी आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? हे देखील सांगावे. आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही.
आयोगाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न
आमदार रोहित पवार म्हणाले की,आयोगाचा पेपर लीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी.