Headlines

येत्या आठ दिवसांत पाहणी करण्याचे निर्देश‎:मोठ्या आस्थापनांच्या अग्निशमन यंत्रणेबाबत व्यापक मोहिम घेणार- जिल्हाधिकारी




जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये सुसज्जित अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार २५ रोजी फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते. जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपायायोजना करण्यावर भर दिला. यासाठी जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापना आणि शासकीस कार्यालयांची येत्या आठ दिवसांत पाहणी करावी. यात प्रामुख्याने अग्निशमनाबाबत उपाययोजना सुचवण्यात याव्यात. तसेच या सूचना पुढील आठ दिवसात अंमलात आणाव्यात. यासाठी आस्थापनांना जबाबदार धरून त्यांच्याकडून अग्निशमन यंत्रणांची दुरूस्ती, देखभाल आवश्यक असलेल्या ठिकाणी नवीन यंत्रणा बसवण्याबाबत कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांद्वार े देण्यात आल्या. रुग्णालयात विजेच्या नियंत्रित वापरावर असलेल्या वैद्यकीय उपकरणांना स्टॅबिलायझर जोडण्यात यावेत. तसेच स्मोक डिटेक्टर कार्यान्वीत होण्यासाठी या यंत्रणेची नियमीत देखभाल करण्यात यावी. मोठ्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एस्टिंग्युशर, होज पाईप किंवा स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ५० टिम तयार करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अग्निशमनाबाबत सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ९० रुग्णालयांची फायर ऑडिटची वैधता संपल्याने बजावली नोटीस महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ९० रुग्णालयांना रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिटसह अग्निसुरक्षा प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्याबाबत नोटीस बजावली आहे. कारण, या ९० ही रुग्णालयांच्या फायर ऑडिटची वैधता संपल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. कारण फायर ऑडिटद्वारे अग्निशमन यंत्रणा, फायर आलार्म, स्प्रिंकलर, स्मोक डिटेक्टर, इमरजन्सी एक्झिट, विद्युत व्यवस्था तसेच इतर सुरक्षा योजना तपासून योग्य स्थितीत आहेत की नाही याची शहानिशा केली जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *