Headlines

जेन-झीमध्ये भगंदरची समस्या वाढली:बदलती जीवनशैली, आहार आणि मोबाईलचा अतिवापर कारणीभूत




बदलती जीवनशैली, फ्रोझन आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे वाढते सेवन तसेच स्वच्छतागृहात मोबाईलचा अतिवापर यामुळे ‘जेन-झी’ पिढीमध्ये भगंदर, मूळव्याध यांसारख्या अॅनोरेक्टल आजारांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये अधिक आढळणाऱ्या या समस्या आता कमी वयाच्या तरुणांमध्येही दिसून येत आहेत, अशी माहिती हिलिंग हँड्स क्लिनिकचे संस्थापक आणि अॅनोरेक्टल सर्जन डॉ. अश्विन पोरवाल यांनी दिली. डॉ. पोरवाल यांनी सांगितले की, १० ते १२ वर्षांपूर्वी भगंदर किंवा मूळव्याधीच्या समस्येमुळे लहान मुलांना उपचारासाठी आणले जात होते. त्यानंतर ही समस्या २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये वाढली. आता ‘जेन-झी’मध्ये फास्टफूड, फ्रोझन आणि प्रक्रिया केलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणे तसेच स्वच्छतागृहात मोबाईलवर बराच वेळ घालवणे यामुळे त्रास वाढत आहे. या समस्यांचा अभ्यास, काम आणि व्यायामावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, हिलिंग हँड्स क्लिनिकने पुढील दोन वर्षांत देशभरातील केंद्रांची संख्या ४० वरून १०० पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. एल कॅटरटनच्या ३० दशलक्ष डॉलर गुंतवणुकीच्या पाठबळावर पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये ६० नवीन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या विस्तारामुळे १०० हून अधिक नवीन पिनकोडमध्ये विशेष अॅनोरेक्टल उपचार उपलब्ध होतील. पुण्यात पुढील १८ महिन्यांत एक समर्पित सुपर-स्पेशालिटी प्रोक्टॉलॉजी रुग्णालय सुरू करण्याचीही योजना आहे. गुंतागुंतीच्या आणि वारंवार होणाऱ्या आजारांवर उपचार, प्रगत शस्त्रक्रिया, संशोधन आणि सर्जन प्रशिक्षणासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या संस्थेची ४० केंद्रे असून ८०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. दरवर्षी सुमारे ५० हजार नवीन रुग्णांवर उपचार केले जातात. मुख्य कार्यकारी अधिकारी रोशन पोरवाल यांनी सांगितले की, केवळ केंद्रांची संख्या वाढवणे हा उद्देश नसून, प्रत्येक शहरात समान दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे एक जोडलेले आरोग्य नेटवर्क उभारणे हे लक्ष्य आहे. हिलिंग हँड्स फाउंडेशनतर्फे आतापर्यंत ४०० हून अधिक आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *